वाशिम, दि. 08 (जिमाका) : कोरोनाबाधित व्यक्तींकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलण्यासाठी कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींच्या यशोगाथा समाजापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. तसेच बरे होवून परतलेल्या व्यक्तींना समाजाकडून चांगली वागणूक मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न करावेत. आवश्यकता भासल्यास कोरोना संसर्ग विषयक अपप्रचार करणार्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिले. 8 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना विषाणू संसर्ग विषयक आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, सुहासिनी गोणेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करतांना यानिमित्ताने जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी अधिकार्यांना केल्या.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ