वाशिम, दि. ०२ (जिमाका) : जिल्ह्यात खरीप २०२० हंगामात झालेल्या पेरण्यापैकी ७५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आलेली आहे. सोयाबीन पीक हे कडधान्य वर्गातील असल्यामुळे झाडाच्या मुळावर गाठी असतात. या गाठीद्वारे हवेतील उपलब्ध असलेले ७८ टक्के नत्र शोषून घेऊन सोयाबीन पिकास उपलब्ध होते. त्यामुळे सोयाबीन पिकाला दुसरी मात्र युरीया खताची देण्याची आवश्यकता नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले आहे.
काही शेतकरी बांधव सोयाबीन पिकास पेरणीनंतर ३० ते ४० दिवसांनी युरीया हे रासायनीक खत देतात, ही पद्धत चुकीची आहे. सोयाबीन पिकास युरीया खत दिल्यास कर्बनत्राचे प्रमाण विषम होऊन पिकाची कायीक वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे फुलधारणा व फळधारणा कमी होते आणि उत्पादनात घट येते. म्हणजेच युरीयावरील अनाठाई खर्च वाढतोच, मात्र पिकाच्या उत्पाकदनात सुध्दा घट येते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी सोयाबीन तसेच इतर सर्व कडधान्य पिकामध्ये युरीया खताची दुसरी मात्रा देऊ नये. विद्यापिठाच्या शिफारशीनुसार शेंगा भरण्याच्या अवस्थेात दोन टक्के युरीया किंवा दोन टक्के डीएपीची फवारणी केल्यास दाणे चांगले भरुन दाण्याच्या वजनामध्ये वाढ होते. त्यामुळे उद्त्पादनातही वाढ होते, असे श्री. तोटावार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ