Ticker

6/recent/ticker-posts

तरुण क्रांती मंचचे सामाजीक पुरस्कार जाहीर : जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांचा समावेश : कोरोनाकाळातील कर्मवीर योध्दांचा होणार विशेष सन्मान


तरुण क्रांती मंचचे सामाजीक पुरस्कार जाहीर : जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांचा समावेश
कोरोनाकाळातील कर्मवीर योध्दांचा होणार विशेष सन्मान
वाशीम - सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या तरुण क्रांती मंचच्या वतीने वर्ष २०२० च्या सामाजीक पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ शाहीर अंबादास पवार, संतसेवाश्री पुरस्कार पंडीत रमाकांत व्यास, प्रशासकीय कामाला गती देवून जिल्हयाची यशस्वीपणे धुरा सांभाळणारे जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक व जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांना सर्वोत्कृष्ट सेवासन्मान तर सेवाव्रती म्हणून कोरोनाच्या काळात घरोघरी जावून आरोग्याची तपासणी करणार्‍या डॉ. सुजाता भगत, उपक्रम संयोजक शिखरचंद बागरेचा, सामाजीक कार्यकर्ते संजीव भांदुर्गे, मदन कोरडे, आयुर्वेदच्या माध्यमातुन कोरोनावर रामबाण उपाय शोधून हजारोंना मोफत औषधीचे वितरण करणारे डॉ. सुजीत सोमाणी, डॉ. सुविधा सोमाणी, रक्तदान चळवळ राबवून अनेकांना वेळोवेळी सहकार्य करणारे आशिष भट्टड, पत्रकार व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे प्रा. गजानन बानोरे, गजानन धामणे, समाजसेवक राजाभैय्या पवार, उद्योजक कृष्णा चौधरी, योग प्रशिक्षीका सौ. तारा राजेंद्र कलवार, सांस्कृतीक व व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणारे उज्वल देशमुख यांना सेवाव्रती तर युवा उद्योजक म्हणून पीसी मॉलचे संचालक अ‍ॅड. नंदकिशोर पाटील, समाजसेवक पुरुषोत्तम चितलांगे, अमर देशमुख, रौनक टावरी यांची निवड करण्यात आल्याची घोषणा पुरस्कार संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. हरिष बाहेती, कार्याध्यक्ष सुरेशचंद्र कर्नावट, पुरस्कार संयोजक निलेश सोमाणी, अनिल केंदळे, डॉ. दीपक ढोके, जुगलकिशोर कोठारी, तेजराव वानखेडे, देवेंद्र खडसे पाटील, युनिक कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. वाळले, प्रा. माधव पाटील, प्रा. बांगर आदींनी केली आहे.
कोविड योध्दांचा होणार सन्मान
    सदर कार्यक्रमात कोरोनाच्या काळात जनतेला मदत करणारे लोकप्रतिनिधी, समाजसेवक यांचा विशेष सन्मान कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यांना विशेष निमंत्रण देवून त्यांच्या कार्याचा गौरव या समारंभात करण्यात येणार आहे. सदर पुरस्काराचे सहप्रायोजक म्हणून युनिक कोचिंग क्लास असून सोशल डिस्टंन्स व शासकीय नियमाचे पालन करुन मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार समारंभ लवकरच आयोजीत करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक निलेश सोमाणी यांनी दिली.