Ticker

6/recent/ticker-posts

मनिष डांगे यांची मनसेच्या प्रभारी वाशीम जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती


मनिष डांगे यांची मनसेच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती
वाशीम - येथील युवा सामाजीक कार्यकर्ते मनिष भास्कराव डांगे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरुन राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी २६ मे रोजी एका नियुक्तीपत्राव्दारे डांगे यांच्यावर प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभार सोपविला आहे. मनिष डांगे हे गेल्या १५ वर्षापासून विविध सामाजीक संघटनांशी जुळलेले असून सामाजीक कार्याच्या माध्यमातून ते सातत्याने अंध, अपंग, निराधार व तळागाळातील गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना शासन स्तरावर पोहचवून त्यांना न्याय मिळवून देत आहेत. नियुक्तीबद्दल विविध स्तरातुन डांगे यांचे अभिनंदन केल्या जात आहे.