निधीअभावी जिल्हयात रमाई आवास योजनेची कामे अडगळीत
वंचित बहूजन आघाडी तीव्र आंदोलन छेडणार - सौ. किरणताई गिर्हे
वाशीम - जिल्हयात सन २०१८-१९ मध्ये मंजुर झालेल्या रमाई आवास योजनेची कामे निधीअभावी अडगळीत पडली आहेत. संबंधीत विभागाचे अधिकारी निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगत असल्यामुळे व्याजाने पैसे काढून बांधकाम पुर्ण करणारे कात्रीत सापडले आहेत. या प्रश्नावर वंचित बहूजन आघाडीच्या वतीने जिल्हयात तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती आघाडीच्या महिला नेत्या सौ. किरणताई गिर्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
रमाई घरकुल आवास योजनेमध्ये तीन/चार टप्प्यात निधी दिला जातो. त्यानुसार घरकुलाचे कामेही त्याच टप्प्यात असतात. आगामी काळात पावसाळा लागणार असल्याने सावकारी पैसे व्याजाने काढून काहींनी कामे पुर्ण केली. मात्र उर्वरीत अनुदानासाठी लाभार्थ्यांना पंचायत समितीत चकरा माराव्या लागत आहेत. त्यातच संबंधीत विभागाचे कर्मचारी मात्र टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. सदर योजनेचा निधी जिल्हा प्रशासनाने परत पाठविल्याचे जिल्हयातील रिसोड पंचायत समितीचे अधिकारी सांगत आहेत. तसेच हा निधी इतर विभागाकडे वळता केल्याचीही चर्चा आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी व लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी वंचित बहूजन आघाडीच्या वतीने जिल्हयात तीव्र आंदोलन छेडणार असून त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सुचना देण्यात आल्याची माहिती सौ. किरणताई गिर्हे यांनी दिली आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ