जिल्हयातील कोरोना योध्दांच्या सुरक्षेसाठी कटीबध्द - डॉ. माधव हिवाळे
रिसोड येथील विविध कार्यालयांमध्ये सॅनिटायझर व मास्कचे वितरण
अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचा सेवाभावी उपक्रम
रिसोड - देशवासीयांना कोरोना महामारीपासून वाचविण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून पोलीस बांधव, डॉक्टर्स, नर्सेस, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांच्यासह प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय अधिकारी, कर्मचारी हे कोरोना योध्दाच्या भूमिकेतून व देशभक्तीच्या भावनेतुन आपले कर्तव्य पार पाडत आहेत. अशा संकटसमयी या सर्व घटकांना सुरक्षा देण्यासाठी अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनच्या सेवाभावी उपक्रमांतर्गत जिल्हयात विविध ठिकाणी सॅनिटायझर आणि मास्कच्या वितरणातून आम्ही आमचे सामाजीक दायित्व पार पाडत असल्याचे प्रतिपादन असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी केले.
स्थानिक नगर परिषद कार्यालय, पोलीस स्टेशन कार्यालय, पोलीस चौकी, ग्रामीण रुग्णालय, तालुका वैद्यकिय अधिकारी कार्यालय याठिकाणच्या कर्मचार्यांसाठी बुधवार, २० मे रोजी सॅनिटायझर आणि मास्कच्या वितरणाचा उपक्रम सामाजीक अंतर ठेवून पार पडला. त्यावेळी या उपक्रमाची भूमिका डॉ. हिवाळे यांनी स्पष्ट केली. या उपक्रमांतर्गत जिल्हा मुख्यालयस्थित जीवनदायी कार्यालयातही सॅनिटायझर आणि मास्कचे वितरण करण्यात आले. यावेळी योजनेचे समन्वयक डॉ. रणजीत सरनाईक, जिल्हाप्रमुख डॉ. अभय निर्बााण, जिल्हा वैद्यकिय अधिकारी डॉ. अनुराग वैद्य आणि पर्यवेक्षक वैभव टाकळे यांनी हे साहित्य डॉ. माधव हिवाळे यांच्या हस्ते स्विकारले. तर रिसोड येथे झालेल्या आरोग्य साहित्य वितरण कार्यक्रमात मुख्याधिकारी गणेश पांडे, पोलीस निरिक्षक अनिल ठाकरे, वैद्यकिय अधिक्षक डॉ मोरे, तालुका आरोग्य अधिकारी वाघ आदींनी हे साहित्य स्विकारले. यावेळी डॉ. माधव हिवाळे, डॉ. विजयकुमार ढोले, डॉ. अरुण जटाळे, अमोल अवताडे, वैभव वैद्य, पवन लाखे आदींची उपस्थिती होती.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ. हिवाळे म्हणाले की, मी मुळचा रिसोड तालुक्यातील पाचंबा येथील रहिवासी असल्यामुळे साहजीकच रिसोड तालुक्याविषयी मला विशेष आपुलकी व सामाजीक जबाबदारीची जाणीव आहे. आपल्या जन्मभूमिच्या ऋणातून उतराई होण्याची संधी मला या कोरोना संकटसमयी मिळाली आहे. प्रत्येक नागरीकांनी आपल्या जन्मभूमिविषयी संवेदना जागृत ठेवून सेवाभाव जोपासण्याचे आवाहनही यावेळी डॉ. हिवाळे यांनी यावेळी केले.
याआधी असोसिएशनच्या वतीने वाशीम येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशनला प्रत्येकी ५ लिटर सॅनिटायझर व २०० मास्कचे वितरण करण्यात आले होते. तर प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या मदतीच्या आवाहनानंतर जिल्हयात सर्वप्रथम डॉ. माधव हिवाळे यांनी पंतप्रधान निधीत ११ हजाराची मदत करुन इतरांना प्रोत्साहीत केले होते. अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनच्या या सेवाभावी उपक्रमाचे वैद्यकिय व सामाजीक क्षेत्रातून कौतूक होत आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ