जिल्हा प्रशासनाचा २२ मे पासून लॉकओपन दिलासा : सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यत दुकानांना परवानगी : दुध व भाजीपाला विक्री पुर्वीप्रमाणेच : व्यायामासाठी खेळाची मैदाने, सलुन आणि स्पा ला परवानगी
वाशीम - कोरोना महामारीमुळे गेल्या २४ मार्चपासून पुर्णपणे बंद असलेले जिल्हयातील व्यवसायांना मे महिन्यात काही प्रमाणात सुट देण्यासोबतच आता २२ मे पासून या व्यवसायांच्या वेळेमध्ये वाढ करण्यात आली आहे. यासोबतच बंदी घातलेल्या केश कर्तनालय, स्पा, व्यायामाची मैदाने यासारख्या काही ठिकाणांनाही सुट देण्यात आली आहे. परंतु दुध व भाजीपाला विक्रीच्या वेळा पुर्वीप्रमाणेच ठेवण्यात आलेल्या आहेत. याशिवाय अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ७ ते सकाळी ७ पर्यत कडक संचारबंदी राहील. जिल्हा प्रशासनाच्या २२ मे पासून लागु होणार्या या नविन मार्गदर्शक सुचनेमुळे लॉकडाऊन असलेल्या जिल्हयातील व्यवसायांना मोठा दिलासा मिळाला असला तरी व्यवसायाच्या जागी जास्तीत जास्त ५ व्यक्तींना प्रवेश, थर्मल स्कॅनरचा वापर, निर्जतुकीकरण, मॉस्क लावणे, हॅन्डवॉश, सॅनिटायझरचा वापर आणि ६ मिटर सामाजीक अंतराची खबरदारी व्यवसायीकांना घेणे सक्तीचे राहील. याबाबतचे विस्तृत आदेश जिल्हाधिकारी ह्षीकेश मोडक यांनी आज २१ मे रोजी काढले.
प्रतिबंधीत (बंद) सेवांची माहिती -
सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वेची प्रवासी वाहतुक. सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग. सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशियम, थिएटर, ऑडीटोरियम, सेमिनारचे ठिकाण, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, बार, असेंब्ली हॉल. सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये व इतर मेळावे. सर्व धार्मिक स्थळे अथवा पुजेची ठिकाणे. धार्मिक सभा, धार्मिक परिषदा, धार्मिक मेळावे व धार्मिक कार्यक्रम. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मैदानांवर सामुहिक खेळ.
परवानगी दिलेल्या सेवांची माहिती -
सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने, कृषि विषयक सर्व सेवा, बँक, खासगी बांधकामे, माल वाहतूक, शहरी व ग्रामीण भागातील उद्योग, ई-कॉमर्स सुविधा, खासगी आस्थापना, कुरीअर, पोस्टल सेवा, रेस्टॉरंटमधून होम डीलीव्हरी. केशकर्तनालये, स्पा. दुचाकीवर एक व्यक्ती. तीनचाकी व चारचाकी वाहनावर चालक व दोन व्यक्तींसह वाहतूक. विवाह समारंभात ५० व्यक्तींची मर्यादा. अंत्यविधीसाठी ५० व्यक्तींची मर्यादा. व्यायामासाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, मोकळी मैदाने खुली. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासनाची महामंडळामध्ये १०० टक्के कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थिती. सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन या अटींसह महारष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्हांतर्गत बस वाहतूकीस ५० टक्के क्षमतेसह वाहतूक. बस स्थानक, रेल्वे स्थानक येथील कॅन्टीन व्यवस्था. रेस्टॉरंटला अन्नपदार्थ घरपोच व्यवस्था.
सक्तीचे आदेश -
शासकीय कर्मचार्यांसाठी आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड. सोशल डिस्टंन्सिंग, नाका-तोंडावर मास्क, रुमाल, गमछा, दुपट्टाचा वापर बंधनकारक. सोशल डिस्टंन्सिंगचे उल्लंघन केल्यास दुकाने बंद. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड. सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन, पण व तंबाखू खाण्यास प्रतिबंध. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई.
वृध्द व लहान मुलांसाठी आदेश -
६५ वर्षावरील व्यक्ती, गरोदर स्त्रीया, १० वर्षाखालील मुले यांनी घरातच थांबावे. केवळ अत्यावश्यक कारणास्तव परवानगी राहील.
परवानगी पासेस -
यापुढे सर्व आस्थापना, प्रतिष्ठाने, सेवा इत्यादीसाठी परवानगीची अथवा पासेसची आवश्यकता राहणार नाही.
अलगीकरण व्यवस्था -
ज्या हॉटेलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस, शासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी वास्तव्यास आहेत, अशांसाठी तसेच अलगीकरण व्यवस्था केलेली हॉटेल सुरु राहतील. रेस्टॉरंट व इतर आदरातिथ्य सेवा आरोग्य खात्याच्या, गृह खात्याच्या व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी करिता तसेच अलगीकरण व्यवस्थेसाठी सुरु राहतील. इतरांसाठी बंद राहतील.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ