Ticker

6/recent/ticker-posts

क्रांतीसुर्य व महामानव जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व व चित्रकलेची ऑनलाईन स्पर्धा : राजा प्रसेनजीत संस्था व नेहरू युवा मंडळाचा पुढाकार


क्रांतीसुर्य व महामानव जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व व चित्रकलेची ऑनलाईन स्पर्धा
राजा प्रसेनजीत संस्था व नेहरू युवा मंडळाचा पुढाकार
वाशीम, 8 एप्रिल - सामाजिक कार्यात अग्रेसर राजा प्रसेनजीत अल्पसंख्याक संस्था व नेहरू युवा मंडळ केकतउमराच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले व महामानव डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त् जिल्हास्तरीय वक्तृत्व व चित्रकला स्पर्धचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे.
 सद्या देशात कोरोना विषाणूने थैमान घातल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत या महापुरुषांची जयंती तमाम जनतेने घरात राहून व शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून साजरी करायची असल्यामुळे ही ऑनलाईन स्पर्धा ठेवण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान हे दोन विषय वक्तृत्व स्पर्धेसाठी आहेत. दोनपैकी एका विषयावर 5 मिनिटांचे वक्तृत्व सादर करतांना व्हिडीओ काढून पाठवायचा आहे. यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय येणार्‍या स्पर्धकाला क्रांतिसूर्य महात्मा फुले व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आकर्षक तैलचित्र असलेले सन्मानचिन्ह, पुस्तक, फोटो, प्रशस्तीपत्र तर सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक प्रशस्तीपत्र देण्यात येईल.   चित्रकला स्पर्धेत स्पर्धकांना महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यापैकी कोणतेही एक चित्र काढून ऑनलाईन पाठवायचे उत्कृष्ट चित्रांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासह सन्मानचिन्ह, फोटो, पुस्तक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हास्तरीय ऑनलाईन स्पर्धेचे आयोजक व संस्था अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर यांनी दिली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक, युवती, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांनी या आगळ्यावेगळ्या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय स्पर्धकांनी चित्रकला स्पर्धेचा फोटो 7447212475 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवायचा असून वक्तृत्व स्पर्धेचा 5 मिनिटांचा व्हिडीओ 7507271542 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धकांनी स्पर्धेसंबंधीत फोटो व व्हिडीओ आपल्या नावासह 14 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यत दिलेल्या क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन नेहरू युवा केंद्र वाशिम तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक प्रदिप पट्टेबहादूर यांनी केले आहे.