Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपआपल्या घरी साजरी करा - तेजराव वानखडे


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपआपल्या घरी साजरी करा - तेजराव वानखडे
वाशीम - महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या 14 एप्रिल रोजी अत्यंत साधेपणाने शासनाचे नियम, अटी व सुचनेच्या आदेशान्वये आपआपल्या घरी साजरी करण्याचे भावनिक आवाहन रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांनी रिपाइं आठवले कार्यकर्ते व नागरीकांना केले आहे.
 कोरोना व्हायरसमुळे संपुर्ण लॉकडाऊन असुन संचारबंदी आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी जनतेला आवाहन करुन सण, उत्सव तसेच महापुरुषांची जयंती गर्दी न करता आपआपल्या घरीच साजरी करुन प्रशासनाच्या सुव्यवस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. शोषीत, पिडीत, वंचित तथा बहुजनांना ज्यांनी अंधारातुन प्रकाशाकडे आणले तसेच जीवन जगण्याचे हक्क बहाल केले त्याच संविधान निर्माता महामानव डॉ. बाबासाहेबांच्या विचारांना मानवंदना देवून त्यांना जयंती उत्सव आनंदाने घरीच साजरी करु या. कोरोना व्हायरस महामारीच्या जागतीक संकटाला रोखण्यासाठी शासनाच्या नियमाचे पालन आपण सर्वांनी केले पाहीजे. मानव समाजाला विज्ञानवादी विचाराने जोपासना करावयाची आहे. हे दिवस सर्वाच्या परिक्षेचे आहेत. ही परिक्षा आपण सर्वांना संविधानिक मार्गाने उत्तीर्ण करता येते. म्हणून कार्यकर्त्यांनो लॉकडाऊनमध्ये शासनाच्या नियमाचे उल्लंघन होणार नाही यासाठी गंभीर रहा. प्रशासनाला बळ द्या, सहकार्य करा असे आवाहन जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांनी केले आहे.