कोरोना महामारीमध्ये कर्तव्यावरील नर्सेसना आरोग्यसुविधेसह शासकीय सेवेत सामावून घ्या
नर्सेस असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने शासनाला निवेदन
वाशीम - कोविड -19 या आजारावरील पिडीतांच्या उपचार आणि देखभालीसाठी विविध शासकीय, निमशासकीय आणि खाजगी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या नर्सेसना शासनाने विविध सोयीसुविधा पुरवून त्यांचे या घातक आजारापासून संरक्षण देण्याची मागणी हुमानिवा नॅचरोपॅथी, योगा, आायुर्वेद, मेडीकल आणि पॅरामेडीकल परिषद व्दारा संचालीत नर्सेस असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ.कु. माया रमेश वाठोरे यांनी 8 एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे व सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास यांना निवेदन पाठविले आहे.
दिलेल्या निवेदनात डॉ. वाठोरे यांनी नमुद केले आहे की, देशासह महाराष्ट्रात कोरोना या संसर्गजन्य आजाराने फास आवळला असून राज्यात दिवसेंदिवस कोरोनाने पिडीत रुग्णांची भर पडत आहे. या कोरोनापिडीत रुग्णाांवर उपचार आणि देखभालीसाठी डॉक्टर्ससह हजारो नर्सेस आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देत आहेत. आपला जीव धोक्यात घालून आरोग्यसेवा देणार्या या नर्सेसना शासनाकडून पुरेशा आरोग्यसुविधा पुरविल्या जात नाहीत. तरी इमानेइतबारे कर्तव्य बजावणार्या या नर्सेसना शासनाने प्रोत्साहनपर भत्ता देण्यासह पि.पि.ई. किट पुरवाव्या. तसेच घरी जाण्याअगोदर या नर्सेसना पुर्णपणे सॅनिटाईज करावे. यासोबतच कोरोनासारख्या आजारामध्ये सेवा दिल्याबद्दल या नर्सेसना शासकीय सेवेत कायमस्वरुपी सामावून घ्यावे. डॉक्टरांपेक्षा कोरोनाची लागण होण्याची भिती ही नर्सेसला जास्त प्रमाणात असते. त्यामुळे शासनाने या नर्सेसना आवश्यक त्या सर्व आरोग्यसेवा तातडीने पुरवाव्या अशी मागणी नर्सेस असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षा डॉ. कु. माया वाठोरे यांनी केली आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ