शेतीउपयोगी अवजारे व ट्रॅक्टरच्या सुटे भाग विक्री दुकानांना संचारबंदीतुन अंशत: सुट
रिसोड तालुक्यासाठी तहसिलदारांचे आदेश : लखनसिंह ठाकूर यांच्या मागणीला यश
(सहसंपादक काशिनाथ कोकाटे)
रिसोड - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर संचारबंदी सुरु असली तरी खरीप हंगाम 2020-21 लक्षात घेता रिसोड तालुक्यातील शेतीउपयोगी अवजारे, साहित्य, सूक्ष्म सिंचन, ट्रॅक्टर व ट्रॅक्टर अवजारे तसेच संंबंधीत वाहनांचे स्पेअर पार्ट (सुटे भाग) विक्रीच्या दुकानांना संचारबंदीतुन अंशत: सुट देण्यात आली असून सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस सकाळी 8 ते 12 या वेळेमध्ये सामाजीक अंतर पाळून सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. रिसोडचे तहसिलदार अजित शेलार यांनी 9 एप्रिल रोजी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. खरीप हंगामाला अनुसरुन शेतकर्यांना होणार्या गैरसोयीबद्दल भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर यांनी 8 एप्रिल रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देवून या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या या मागणीला यश मिळाले असून रिसोड तालुक्यातील शेतकर्यांना अंशत: दिलासा मिळाला आहे.
15 एप्रिलपर्यत जिल्ह्यात सुरु असलेल्या संचारबंदी काळात शेतकर्यांना मदत व्हावी यासाठी कृषी यंत्रणा, चारचाकी व दुचाकी सुटे भाग विक्रीची दुकाने सुरु ठेवण्याची मागणी ठाकुर यांनी केली आहे. तहसिलदार श्री शेलार यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद केले आहे की, रिसोड तालुक्यात संचारबंदीमुळे शेतीउपयोगी अवजारे, साहित्य, सूक्ष्म सिंचन, ट्रॅक्टर व ट्रॅक्टर अवजारे तसेच संंबंधीत वाहनांचे स्पेअर पार्ट (सुटे भाग) विक्रीची दुकाने बंद आहेत. येणारा खरीप हंगाम 2020-21 लक्षात घेता वरील सर्व अवजारांचा वापर शेतीकामे करतांना आवश्यक आहे. जर दुकाने बंद राहीली तर शेती मशागतीची व इतर सलग कामे वेळेवर होणार नाहीत. तसेच ज्या पिकांची काढणी व मळणी राहीलेली आहे त्यांचे नुकसान होवू शकते. शेतीसंबंधीत सर्व कामे वेळ मर्यादीत व निसर्गावर अवलंबून ती वेळेवर होणे आवश्यक आहे. शेतीमधून उत्पादीत होणारे अन्नधान्य, कडधान्य व भाजीपाला हे जीवनावश्यक वस्तुमध्ये येत असल्यामुळे त्यांच्या उत्पादनावर व गुणवत्तेवर कोणताही परिणाम होवू नये याकरीता वरील सर्व साहित्यांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यामुळे रिसोड तालुक्यातील वरील सर्व साहित्य व अवजारांची दुकाने आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस सकाळी 8 ते 12 या कालावधीत पुढील आदेश होईपर्यत सुरु राहतील असे या आदेशात नमूद केले आहे. तसेच संबंधीत दुकानदारांनी कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाही याची उपाययोजना करावी. येणार्या शेतकर्यांमध्ये दोन मिटर अंतर राहील अशाप्रकारे निशाणी आखुन घ्यावी. दुकानात गर्दी होवू देवू नये. शेतकर्यांना हात धुण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था व हात निजंर्तुकीकरण करण्यासाठी निर्जेतूक करणारी औषधे ठेवण्यात यावी. तसचे नियमाचे तंतोतंत पालन करुन विक्री करावी असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. खरीप हंगामाच्या तयारीच्या अनुषंगाने शेतीसंबंधीत दुकानांना संचारबंदीतून अंशत: सुट मिळाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. तसेच लखनसिंह ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ