भुकेने व्याकुळलेल्या जिवांना मदत हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन - प्रविण पट्टेबहादूर
घरातच जयंती साजरी करुन कोरोना लढा यशस्वी करण्याचे राजा प्रसेनजित संस्थेचे आवाहन
वाशीम - यावर्षी कोरोना महमारीच्या रुपाने देशावर भिषण संकट उभे ठाकले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सामाजीक अंतर पाळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे यावर्षी बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिल रोजी जयंती घरातच राहुन साधेपणाने साजरी करण्यासह भुकेने व्याकुळलेल्या जिवांना मदत करणे हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन ठरेल. त्यामुळे नागरीकांनी यावर्षी नाचून नव्हे तर महामानवांची पुस्तके वाचून जयंती साजरी करण्याचे आवाहन राजा प्रसेनजित संस्थेचे अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर यांनी केले आहे.
भारतात लॉकडाऊनमुंळे कोरोनाची विषाणू संसर्गाची साखळी तुटण्याला मदत होते. त्यामुळे सरकारने सर्व सामाजिक, धार्मिक सण, उत्सव, यात्रा, मेळावे इत्यादी अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून नागरीकांना सामाजीक अंतर पाळण्याचे आवहान केले आहे. जेव्हा जेव्हा या देशावर संकट आली तेव्हा तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या संकटसमयी मदत करून देशाला प्रथम प्राधान्य देत मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमत: भारतीय आहे एवढे या देशाबद्दल बाबासाहेबांना प्रेम होते. त्यामुळे यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण आपल्या घरातच पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन त्रिशरण, पंचशील ग्रहण करावे. पुष्पहार घालून, मेणबत्ती लावून अतिशय संवेदनशील वातावरणात जयंती साजरी करून आपल्या देशावर आलेले कोरोना संकट घालवण्यासाठी आपण पूर्णपणे कटीबद्द असल्याची शपथ घेऊन शासन, प्रशासनाला सहकार्य करण्याचा विडा उचलावा. जयंतीदिनी आपण घरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी एैकावी. त्यांचे जिवन चरित्र व त्यांनी लिहीलेली पुस्तके वाचावी. म्हणजे यावर्षी नाचून नाहीतर वाचून भीमजयंती साजरी करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन प्रविण पट्टेबहादूर यांनी केले आहे. एवढेच नव्हे तर ज्या गावात भीम जयंतीनिमित्त काही मदत जमा झाली असेल तर ती मदत भुकेने व्याकुळ झालेल्या गावातील गोरगरीब कुटुबांना द्यावी. बाहेर जिल्ह्यात अडकलेले कामगार, विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था आगळ्याावेगळ्या पध्दतीने भिमजयंती साजरी करण्याचे आवाहन पट्टेबहादूर यांनी केले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ