पाच अट्टल गुन्हेगारांवर संघटीत गुन्हेगारी कायदा (मकोका) लागु
वाशीम जिल्हयातील दुसरी कारवाई : विशेष पोलीस महानिरिक्षकांकडून प्रस्तावाला मंजुरी
वाशीम - आर्थिक फायद्यासाठी व टोळीचे वर्चस्व गाजविण्यासाठी मागील दहा वर्षापासून अकोला, यवतमाळ व वाशीम जिल्ह्यात गंभीर गुन्हे दाखल असलेला टोळीप्रमुख सुखदेव चव्हाण (६०) रा, धानोरा भुसे ता. मानोरा जि. वाशीम, सचिन धनराज जाधव (२५) रा. गौतमनगर कारंजा जि. वाशीम, अजय गजानन चव्हाण (२५) रा. गौतमनगर कारंजा जि. वाशीम, विनोद भरत मोहीते (२५) रा. धामणगाव वाठोडा ता.जि. वर्धा व गजानन पंडीत चव्हाण (५०) रा. गौतमनगर कारंजा जि. वाशीम या पाच जणांवर अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षकांनी दिलेल्या मंजुरीनुसार वाशीम जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांनी कलम ३ (१), ३ (४) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागु करण्याची कारवाई केली आहे. वाशीम जिल्हयातील ही दुसरी कारवाई असून याआधी संतोष ठोके व त्यांच्या टोळीवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती.
मकोका दाखल झालेल्या या पाच गुन्हेगारांवर फिर्यादी धरमराज लक्ष्मणप्रसाद कोली (३२) रा. चंदेरी ह.मु, बाजारगाव कोंडोली जि. नागपूर यांच्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन मानोरा येथे १६ जानेवारी रोजी कलम ४२०, ३९५, ५०६ भांदवी अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाची थोडक्यात माहीती अशी की, फिर्यादी कोली याची बहीण पुजा कोली हिला मुल होण्याकरीता आरोपी विनोद मोहीते याने दुसरा आरोपी सचिन जाधव याच्या संगनमताने माहुर येथील एक बाबा औषध देतात अशी बतावणी करुन फिर्यादीला ७० हजार रुपयाची मागणी करुन फिर्यादीला पैसे घेवून माहुर येथे येण्यास सांगीतले. त्यानुसार फिर्यादी पत्नीसह वाहनाने दिग्रस येथून जात असतांना मुख्य सुत्रधार सुखदेव चव्हाण व त्याच्या इतर साथीदारांनी फिर्यादीच्या पत्नीेच्या गळ्यातीील मंगळसुत्र हिसकावले व जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच नगदी ७० हजार व मंगळसुत्र किंमत ९ हजार असा एकूण ७९ हजार रुपयाचा माल जबरीने हिसकावुन पोबारा केला. फिर्यादींनी मानोरा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तकाारीनुसार पोलीसांनी गुन्हा तपासात घेतला. तसेच सदर पाच गुन्हेगारांविरुध्द अकोला, यवतमाळ व वाशीम जिल्हयात गेल्या १० वर्षात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने या गुन्हेगारांविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ अन्वये वाढ करण्याबाबत विशेष पोलीस महानिरिक्षक अमरावती यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. यसाठी अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, मानोरा ठाणेदार शिषीर मानकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक शिवाजी ठाकरे, सपोनी अतुल मोहनकर, पोउपनि योगेश रंधे यांनी सदर गुन्हेगाराशी संबंधीत जिल्हयातील पोलीस स्टेशनकडून रेकॉर्ड हस्तगत करुन वरिष्ठ अधिकार्यांना सादर केला. या प्रस्तावाला महानिरिक्षकांनी मंजुरी दिल्यानंतर या पाच आरोपींविरुध्द जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांनी मकोका लागु केला. तसेच सदर गुन्हेगारांविरुध्द गुन्ह्याचा बारकाईने तपास करुन प्रभावी कारवाई करण्याचे आदेश निर्गमित केले.
दरम्यान वाशीम जिल्ह्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हेगार, त्यांना पाठीशी घालणार्या व मदत करणार्या व्यक्ती यांच्या वर्तनात बदल न झाल्यास अशांवर सुध्दा अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्याचा इशारा जिपोआ वसंत परदेशी यांनी दिला आहे. सोबतच अशा गुन्हेगारी टोळ्यांची माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ