लखनसिंह ठाकूर यांच्या साध्या पत्राची वनमंत्री ना. राठोड यांनी घेतली दखल
गरजेनुसार वनविभागाला कोरोना युध्दात मदतीसाठी समावेशाबाबत निर्णय
रिसोड, दि. 8 एप्रिल - कोरोना या जागतीक महामारीशी महाराष्ट्रातील पोलीस आणि आरोग्य विभाग लढत असतांना पोलीस विभाग आणि आरोग्य विभागाच्या मदतीला वनविभागाच्या कर्मचार्यांना सहभागी करुन घेण्याची मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी राज्याचे वनमंत्री ना. संजय राठोड यांच्याकडे केली होती. या मागणीची वनमंत्र्यांनी दखल घेवून ठाकूर यांच्या सुचनेचे स्वागत केले आहे. तसेच राज्याचे पोलीस दल हे सक्षम असून त्यांच्या मदतीला राखीव पोलीस दल गरज पडल्यास तयार असून तशीच गरज पडल्यास राज्य कोअर टिम याबाबत निर्णय घेईल असे वनमंत्र्यांनी ठाकूर यांना वैयक्तीकरित्या पाठविलेल्या दखलपत्राव्दारे कळविले आहे.
यावेळी वनमंत्र्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, राज्यातील करोना साथ नियंत्रणाकरीता राज्य पातळीवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जवळपास 18 प्रधान सचिवांची टिम कार्यरत आहे. त्यांना ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सर्व करण्याची मुभा राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे. याबाबत रोज सकाळी 11 वाजता या टिमची बैठक होते व दिवसभराचे नियोजन होते. परत संध्याकाळी 5 वाजता दिवसभराच्या परिस्थितीचा आढावा होतो. मुख्यमंत्री महोदय एक दिवसाआड जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्ताचा आढावा या टिमसोबत घेतात. आपले पोलीस दल हे सक्षम आणि पुरेसे आहे. त्यांच्या मदतीला राज्य राखीव पोलीस बल आहे. परंतु त्यांचा वापर अद्याप केलेला नाही. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी वापरण्याची सुचना चांगली आहे. परंतु खुप जास्त लोकांना कामावर लावल्यास अधिक गोंधळ वाऐल. गरजेनुसार राज्यपातळीवर याबाबत कोअर टिमबरोबर चर्चेअंती अंतीम निर्णय होईल. वनविभागाचे 25 हजार कर्मचारी याकरीता सदैव तत्पर असल्याची माहितीही यावेळी वनमंत्री ना. संजय राठोड यांनी दिली आहे. वनमंत्र्यांनी एक सजग नागरीक आणि कार्यकर्त्याने पाठविलेल्या साध्या पत्राची तातडीची दखल घेवून सुचक उत्तर पाठविलेल्यामुळे लखनसिंह ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ