शेतकरी व फळे, भाजीपाला विक्रेत्यांना मास्क आणि हॅन्डग्लोजचे वाटप
कृषी विभाग, आर.सी.एफ. आणि इफको कंपनीचा पुढाकार
वाशीम - कोरोना विषाणू संसर्गापासुन नागरीकांचा बचाव अणि जनजागृतीच्या अनुषंगाने शासनाचा कृषी विभाग, राष्ट्रीय केमिकल्स अॅन्ड फर्टीलायझर्स आणि इफको कंपनीच संयुक्त पुढाकारातुन तसेच जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांच्या मार्गदर्शनात कृषि अधिक्षक शंकर तोटावार आणि आत्माचे प्रकल्प संचालक यांच्यामार्फत शहरातील ठिकठिकाणचे भाजीपाला विक्रेते आणि शेतकरी बांधवांमध्ये 9 एप्रिल रोजी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी फळविक्रेते, दुध विक्रेते, भाजीपाला विक्रेते आणि शेतकरी बांधवांना मास्क आणि हॅन्डग्लोजचेही वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रम शहरातील जिल्हा क्रीडा संकुल मैदान, आयुडीपी कॉलनी, बाजार समिती व गुरुवार बाजार येथे राबविण्यात आला. यावेळी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याकरिता उपाययोजना म्हणून विक्रेत्यांना मास्क व हॅन्डग्लोज देण्यात आले. या कार्यक्रमाला कृषी विभागाचे जिल्हा अधिक्षक शंकर तोटावार, कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेचे जिल्हा सचिव सुनील पाटील, कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेचे पदाधिकारी, कृषी विभागातील तंत्र अधिकारी मकासरे, मंडळ अधिकारी दिलीप कंकाळ, कृषी सहाय्यक दिपक आरु, डॉ. हुसेन, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय दुधे, गजानन भोयर आदींची उपस्थिती व परिश्रम लाभले. या कार्यक्रमात नगराध्यक्ष अशोक हेडा यांनीही सहभाग घेवून स्थानिक गुरुवार बाजारातील फळे व भाजीपाला विक्रेत्यांना व ग्राहकांना मास्क, हॅन्डग्लोज तसेच सुरक्षा किटचे वितरण केले. तसेच कोरोना विषाणूपासून बचावाबाबत जनजागृती केली.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ