Ticker

6/recent/ticker-posts

सुरकंडी येथे हातभट्टीच्या दारुअड्ड्यावर वाशीम ग्रामीण पोलीसांचा छापा - 2 लाख 10 हजाराचा माल जप्त - 5 आरोपींवर दारुबंदी कायद्यानुसार गुन्हे


सुरकंडी येथे हातभट्टीच्या दारुअड्ड्यावर वाशीम ग्रामीण पोलीसांचा छापा
2 लाख 10 हजाराचा माल जप्त : 5 आरोपींवर दारुबंदी कायद्यानुसार गुन्हे
वाशीम - संचारबंदी काळात तालुक्यातील ग्राम सुरकंडी येथील शिवारात अवैधरित्या हातभट्टीची दारुविक्री करणार्‍या दारुअड्ड्यावर वाशीम ग्रामीण पोलीसांनी छापा मारुन 2 लाख 10 हजाराच्या मुद्देमालासह 5 आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. कारवाईदरम्यान एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.
 याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हयात कोरोना आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने अत्यावश्यक सेवा वगळता 1 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यत कलम 144 अन्वये संचारबंदी लागु करण्यात आली आहे. या संचारबंदीदरम्यान वाशीम ग्रामीण पोलीसांकडून ग्रामीण हद्दीत पेट्रोलींग करत असतांना ग्राम सुरकंडी येथील शिवारात काही इसम हातभट्टीची दारु विकत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून पोलीसांना मिळाली. या माहितीवरुन सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, ग्रामीणचे ठाणेदार संजय शिपणे व पोलीस चमुसह सुरकंडी शेतशिवारात छापा मारुन 5 आरोपींा ताब्यात घेतले. यावेळी पोलीस कारवाईदरम्यान एक आरोपी अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. या कारवाई दरम्यान 100 लिटर हातभट्टीची दारु (किंमत 10 हजार), 500 लिटर सडवा मोहा माच (किंमत 50 हजार), 3 मोटरसायकली (किंमत 1 लाख 50 हजार) असा एकूण 2 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपींविरुध्द ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कलम 65 (ई) (फ) नुसार महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, ग्रामीणचे ठाणेदार संजय शिपणे, एएसआय रवि सैबेवार, पोहवा. राजेंद्र वानखडे, पोना संतोष पाईकराव, पोना बडेराव, पोना संजय क्षिरसागर, पोकॉ. आशिष पाठक, पोकॉ. रवि जवंजाळ, पोकॉ. मनिष बिडवे, पोकॉ. उमेश देशमुख, पोकॉ. गजानन ब्राम्हण व मपोका मिनाक्षी भाकरे यांच्या सहभागातून यशस्वीरित्या राबविण्यात आली.