आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ घरोघरी कोरोना संरक्षक किटचे वाटप
स्काऊट मास्टर विनोद राजगुरु यांचा काजळांबा येथे स्तुत्य उपक्रम
वाशिम - येथून जवळच असलेल्या ग्राम काजळांबा येथे १४ एप्रिल रोजी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून जि. प. शाळेतील पदवीधर शिक्षक तथा स्काऊट गाईड मास्टर विनोद राजगुरु यांच्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेतील वर्ग १ ते ७ च्या सर्व विद्यार्थ्यांना सामाजीक अंतराचे भान ठेवून घरोघरी कोरोना संरक्षक किटचे वाटप करण्यात आले.
सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल राऊत, सरपंच सौ. शशिकला मनवर, समिती उपाध्यक्ष ऊत्तम सोनटक्के, उपसरपंच संतोष उगले, पोलीस पाटील संजय महाले, शाळेचे मुख्याध्यापक उद्धव कष्टे यांनी कोरोना बाबत सोशल डिस्टन्स ठेवून महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. यानंतर शाळेचे शिक्षक व स्काऊट गाईड पथकातील काही विद्यार्थी यांचे गट पाडून गावात घरोघरी जाऊन वर्ग १ ते ७ मधील विद्यार्थ्यांना कोरोना संरक्षक किट देण्यात आल्या. यामध्ये मास्क, साबण, कोरोना आजाराविषयी घ्यावयाची काळजी असे जनजागृती माहिती पत्रक व इतर साहित्य या किटमध्ये देण्यात आले. हे साहित्य वाटप करतेवेळी मुख्याध्यापक उद्धव कष्टे, पदवीधर शिक्षक मधुकर महाले, हरिष गांधी, सुरेश महाले, गजानन महाले, मदन इंगळे, तुकाराम चोपडे, राजू इंगोले, शाळा समिती सदस्य गजानन उगले, सामाजिक कार्यकर्ते राम उगले यांच्यासह शाळेतील स्काऊट गाईड पथक ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य लाभले. आईच्या स्मृतिप्रित्यर्थ राबविलेल्या या सामाजिक उपक्रमाबद्दल पदवीधर शिक्षक तथा स्काऊट मास्टर विनोद राजगुरु यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ