‘तबलिगी जमात’ सारख्या कार्यक्रमात सहभागी व्यक्तींनी आपल्या व परिवाराच्या आरोग्य सुरक्षेसाठी पुढे यावे
स्वेच्छेने माहिती देण्यासाठी प्रशासनाच्या हेल्पलाईन क्रमांकाची मदत
जिल्हा प्रशासनाचे जाहीर आवाहन
वाशिम, दि. 06 : निजामुद्दीन मरकज दिल्ली, हरियानामधील पानिपत जिल्हा, राजस्थान, उत्तर प्रदेश व देशाच्या इतर भागातील तबलिगी जमातसारख्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी आपली माहिती स्वच्छेने जिल्हा प्रशासनाला कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले असून माहिती संकलनासाठी नोडल अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूला प्रतिबंध केल्यास कोविड-19 या आजारापासून बचाव शक्य आहे. त्यामुळे तबलिगी जमातसारख्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींनी आपले कुटुंब, आपले प्रियजन, आपला समाज, आपल्या गावाला कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी पुढाकार घेवून प्रशासनाला सहकार्य करावे. आपणास जिल्हा प्रशासनामार्फत योग्य ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी म्हटले आहे. तसेच आपण जमात व यासारख्या कार्यक्रमांमध्ये सामील झाल्याची माहिती प्रशासनापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवल्यास आपणाविरुद्ध जाणीवपूर्वक कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग केल्याबद्दल भारतीय दंड विधान 1860 च्या कलम 269, 270, 188 व 34 अन्वये कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असा इशाराही जिल्हाधिकार्यांनी दिला आहे.
हेल्पलाईन क्रमांक जाहीर
देशात विविध ठिकाणी झालेल्या जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे (भ्रमणध्वनी क्र. 9850525353) यांच्याशी संपर्क साधून आपली माहिती द्यावी अथवा 8379929415 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून अथवा व्हॉटसअप संदेशाद्वारे किंवा 07252-234238 या क्रमांकावर आपले नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक आदी माहिती सादर करावी. तसेच इतर नागरिकांनाही याबाबत काही माहिती त्यांनी वरील क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
