Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हास्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद


जिल्हास्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद
तेजस सोमाणी, कु. शरयू आळणे, सोहम घुगे ऑनलाईन स्पर्धेचे मानकरी
वाशिम - येथून जवळच असलेल्या ग्राम केकतउमरा येथील राजा प्रसेनजीत संस्था व नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ केकतउमरा द्वारा आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे चित्र काढण्याचा विषय देण्यात आला होता. या दोनही विषयावर जिल्ह्यातून अनेक जणांनी आपले चित्र पाठवले. या चित्रकला स्पर्धेचा निकाल दिनांक १५ एप्रिल रोजी या स्पर्धेचे परिक्षण यश कंकाळ, विक्की सावंत यांनी करून निकाल घोषित केला. यामध्ये महात्मा फुले यांच्या चित्राला जिल्ह्यातून प्रथम क्रमांक हॅप्पी फेसेस शाळेचा विद्यार्थी तेजस निलेश सोमाणी यांनी मिळविला. तर द्वितीय क्रमांक बाकलीवाल शाळेतील विद्यार्थीनी कु शरयू दुर्गेश आळणे हिने पटकाविला. तृतीय एस एम सी शाळेचा विद्यार्थी सोहम उमेश घुगे याने क्रमांक प्राप्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन चित्रकला जिल्हास्तरीय स्पर्धा २०२० चे मानकरी ठरले आहेत. परीक्षकांनी पुढे दोन प्रोत्साहन पर क्रमांक कु. मुक्ता संतोष वानखेडे, रोशन संजय बाजड यांना जाहीर केले. या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व खर्‍या अर्थाने डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती साजरी झाली असल्याचे मत स्पर्धा आयोजक संस्थेचे अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर यांनी व्यक्त केले. 
 ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्रदिप पट्टेबहादूर, शिक्षक राजकुमार पडघान, आकाश भालेराव, महेश खडसे, वैभव वाकुडकर यांनी सहकार्य केले. या सर्व विजयी स्पर्धकांचे व सहभागी सर्व स्पर्धकांचे संस्थेचे अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर, नेहरू युवा मंडळाचे प्रदिप पट्टेबहादूर यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा महत्वपूर्ण उपक्रम राबविण्याला वाशिम पंचायत समिती येथील कार्यरत आदर्श पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक अरविंद भिवाजी पडघान यांनी विशेष सहकार्य केले. सदर स्पर्धेचे बक्षिस वितरण लवकरच जिल्ह्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती संस्था अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर यांनी प्रसिद्धीपत्रकातुन दिली आहे.