Ticker

6/recent/ticker-posts

लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन भीम बुद्ध गीत गायन स्पर्धेत अनेकांचा सहभाग


लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन भीम बुद्ध गीत गायन स्पर्धेत अनेकांचा सहभाग
उमरा येथे आगळ्यावेगळ्या पध्दतीने भिमजयंती साजरी
वाशीम - कोरोना या वैश्‍विक महामारीच्या अनुषंगाने सर्वत्र संचारबंदी असतांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती जिल्हयातील आंबेडकरी अनुयायी व नागरीकांनी मोठ्या उत्साहात आपआपल्या घरीच साजरी करत विविध स्पर्धा व कार्यक्रमही ऑनलाईन घेवून भिमजयंती यशस्वीरित्या साजरी केली. या ऑनलाईन स्पर्धेेत अनेकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या अनुषंगाने तालुक्यातील उमरा शम. येथे सांस्कृतीक क्षेत्रात कार्यरत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त म. ज्योतीबा फुले शिक्ष, कला, क्रीडा व आरोग्य बहूउद्देशि संस्थेच्या वतीने म. ज्योतीबा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भिम बुध्द गितगायनाच्या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन केले होते. याबाबतचे आवाहन सोशल मिडीयावर करताच अनेकांनी या स्पर्धेत मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. यावेळी स्पर्धक व कलावंतांनी आपआपल्या घरातच बसुन गायनाचे एकाहुन एक सरस व्हिडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमातून आयोजकांनी पाठविले. सदरहू ऑनलाईन स्पर्धेचे बक्षीस वितरण संचारबंदी संपल्यावर वितरीत करण्यात येईल असे आयोजक संस्थाध्यक्ष संतोष खडसे यांनी सांगीतले. 
 या ऑनलाईन स्पर्धेत या स्पर्धेत कलावंत शाहीर प्रज्ञानंद भगत वाशिम, भागवत धनगर पुसद, सोनाली खडसे मानोरा, भगवान कांबळे काजळंबा, प्रा. धांडे सर रिसोड, नामदेव खडसे चिंचखेडा, कोंडबा इंगोले, नंदाबाई इंगोले ब्राह्मणगाव, रतन गायकवाड, लीला गायकवाड, लक्ष्मण वानखेडे पांगरी धनकुटे, मदन भगत, बाहिणाबाई भगत, यशवंता खडसे, सिद्धार्थ भगत उमरा कापसे, शेषराव मेश्राम वाशिम, श्रीपत खडसे, प्रकाश खडसे, सुरेश श्रुंगारे, सुजाता श्रुंगारे, गजानन खडसे उमरा शम आदी स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. या स्पर्धेेासोबतच कोरोनाला हरविण्यासाठी नागरीकांनी कुठेही गर्दी न करता सामाजीक अंतराचे भान ठेवून आपआपल्या घरीच सुरक्षीत राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.