खरोळा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याना शालेय पोषण आहाराचे वितरण
वाशीम - जागतीक आरोग्य संस्थेने घोषीत केलेल्या करोना या वैश्विक महामारीचा मुकाबला करण्यासाठी आज महाराष्ट्रातील प्रत्येक नागरीक हा सैनिकाची भूमिका बजावत असून समोरासमोर न दिसणार्या या शत्रुचा मुकाबला आपण स्वत: स्वच्छ राहून तसेच आपल्या व आपल्या परिवाराच्या आरोग्याची योग्य काळजी राखून केल्यास या शत्रुचा नायनाट होवू शकतो. ही बाब ध्यानात घेवून तालुक्यातील ग्राम खरोळा येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे. गावकर्यांना आरोग्य सुरक्षा किटच्या वाटपासोबत सामाजीक अंतराचे भान, वेळोवेळी हात धुण्याबाबत जागरुकता आदी नियमांचे पालन करण्याबाबत गावकर्यांमध्ये विशेष जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी गावचे सरपंच दिपक खडसे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य परिश्रम घेत आहेत. करोना विषाणूच्या प्रकोपामुळे शाळांना सुटी असण्यासोबत १४ एप्रिलपर्यत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेश पोषण आहार वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जि.प. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष निकम, शाळा समिती सदस्य तथा सरपंच दिपक खडसे, मुख्याध्यापक गजानन राऊत, महाले सर, वाघमारे मॅडम, अनिल खडसे, समाजसेवक गोपाल ठाकरे आदींच्या सहकार्यातून शालेय विद्यार्थ्यांना योग्य सामाजीक अंतर ठेवून शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. शालेय पोषण आहार मिळाल्याबद्दल यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
