Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायतच्या वतीने खरोळा ग्रामस्थांना आरोग्य सुरक्षा साहित्याचे वाटप


ग्रामपंचायतच्या वतीने खरोळा ग्रामस्थांना आरोग्य सुरक्षा साहित्याचे वाटप
वाशीम - करोना या जागतीक महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी तालुक्यातील ग्राम खरोळा येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांना विविध आरोग्य सुरक्षा साहित्य कीटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम ३१ मार्च रोजी सामाजीक अंतराचे भान राखून घेण्यात आला. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गावातील घरोघरी जावून महिला भगिनींना हात धुण्यासाठी हॅन्डवॉश, घरातील भांडी धुण्यासाठी किचर किलर यासह हार्पीक व फिनाईलचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी ग्राम खरोळाचे प्रथम नागरीक व सरपंच दिपक खडसे, उपसरपंच कैलास खडसे, केशव ठाकरे, मधुकर खडसे, संतोष निकम, सुधीर वारकड, विनोद वारकड, गजानन ठाकरे, निलेश खडसे, संतोष सोनु, युवा समाजसेवक गोपाल ठाकरे आदींनी पुढाकार व परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थांना योग्य पध्दतीने हात धुण्यासोबतच करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजनेबद्दल प्रात्यक्षीकाव्दारे गावकर्‍यांमध्ये जनजागृती करण्यात आली.