Ticker

6/recent/ticker-posts

बसव जयंती निमित्त राष्ट्रीय बसव वक्तृत्व स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन - सहभागी होण्याचे वचन अकादमी, महाराष्ट्रवे आवाहन


बसव जयंती निमित्त राष्ट्रीय बसव वक्तृत्व स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन
विविध रोख पारितोषीकांचे लयलुट
सहभागी होण्याचे वचन अकादमी, महाराष्ट्रवे आवाहन
वाशीम - बाराव्या शतकातील थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्‍वर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र संचारबंदीच्या अनुषंगाने वचन अकादमी महाराष्ट्रच्या वतीने राष्ट्रीय बसव वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दिनांक 23 ते 30 एप्रिल दरम्यान करण्यात आले आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने विजेत्या स्पर्धकांसाठी विविध रोख पारितोषीके ठेवण्यात आली आहेत.
  महात्मा बसवेश्वरांच्या वैश्विक विचारांचे संशोधन, प्रचार-प्रसार, लेखन आणि चिंतन करण्याच्या उद्देशाने वचन अकादमी कार्यरत आहे. चिंतन शिबिरे, परिषदा, कार्यशाळा, व्याख्यानमाला, बसव साहित्य संमेलने, नव संशोधकांना मार्गदर्शन आदी उपक्रम अकादमी राबवित आहे. आज कोरोना महामारीने संपूर्ण जग चिंतेत पडले आहे. लॉकडाऊन मध्ये असलेल्या या  चिंतेच्या काळात बसव जयंतीच्या निमित्ताने सर्वांना  चिंतेकडून चिंतनाकडे  वळविण्यासाठी ऑनलाइन पद्धतीनेच राष्ट्रीय बसव वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. 
  स्पर्धेसाठी मानवतावादी महात्मा बसवेश्वर, वचन साहित्यातून व्यक्तीमत्व विकास, अर्थतज्ज : महात्मा बसवेश्वर, उत्तम प्रशासक : महात्मा बसवेश्वर, लोकशिक्षक : महात्मा बसवेश्वर,   राष्ट्रनिर्माते : महात्मा बसवेश्वर, बहुजन उद्धारक : महात्मा बसवेश्वर, स्त्रीकुलोद्धारक : महात्मा बसवेश्वर, अंधश्रद्धा निर्मूलक : महात्मा बसवेश्वर, एकविसाव्या शतकापुढील आव्हानांना सामोरे जाताना महात्मा बसवेश्वर हे विषय वक्तृत्व स्पर्धेसाठी ठेवण्यात आले आहेत.
  स्पर्धेतील प्रथम पारितोषीक पाच हजार एक रुपये लिंगैक्य नागोराव रामजी टपरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रा. गिरीश टपरे, वर्धा यांचे कडून, व्दितीय पारितोषीक तीन हजार एक रुपये लिंगैक्य बाबुराव ईरप्पा पटणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ शिवकुमार गाजले, पुणे यांचे कडून तर तृतीय पारितोषीक दोन हजार एक रुपये लिंगैक्य प्रा.सुभाष घोडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रा. हरीश घोडेकर, वाशिम यांचेकडून देण्यात येईल. याशिवाय प्रा. जवाहर चनशेट्टी, लातूर यांचेकडून एक हजार एक रुपये प्रोत्साहनपर पारितोषीक देण्यात येईल. विजयी स्पर्धकांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यासोबतच सर्व पारितोषीकांमध्ये 50 टक्के रोख रक्कम व 50 टक्के  ग्रंथसंपदा राहील असे अकादमीच्या वतीने कळविण्यात आले आहे. याशिवाय एकवीस वर्षे वयापर्यंतच्या स्पर्धकांनी दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर जास्तीत जास्त सात ते दहा मिनिटांपर्यंतचा  वक्तृत्वाचा व्हिडिओ बनवून प्रा. सचितानंद बिचेवार मो.  9421831538, ई मेल email - vachanacademy15@gmail.com, राजू ब. जुबरे मो. 08904638908 ई मेल jubareraju@gmail.com यांच्या टेलिग्रामवर, व्हाट्सअप किंवा ई-मेलवर 23 ते 30 एप्रिल दरम्यान पाठविण्याचे आवाहन वचन अकादमीच्या वतीने करण्यात आले आहे.