लॉकडाऊन बंदोबस्तामध्ये वनविभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांना सहभागी करा
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर यांचे वनमंत्री ना. संजय राठोड यांना निवेदन
वाशिम, 5 एप्रिल - महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या काळात पोलीस विभागावर दिवसेंदिवस मोठा ताण पडत असून त्यांचा हा ताण कमी करण्यासाठी वनविभागातील सर्व घटकांना बंदोबस्त व इतर कामी सहभागी करुन घेण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी वनमंत्री ना. संजय राठोड यांना निवेदन देवून केली आहे.
निवेदनात नमूद आहे की, आपल्या राज्यामध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे आणि सध्या या जीवघेण्या विषाणूच्या संसर्गामुळे भारतासह महाराष्ट्रातील जनजीवन धोक्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, आटोक्यात यावा याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 एप्रिलपर्यत संपुर्ण भारतात लॉकडाऊन घोषीत केले आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी घरातच थांबावे, बाहेर निघू नये, सामाजिक अंतर जपावे अशा सूचना सर्व राज्यांना आरोग्य मंत्रालयाने केले आहे. या संकटाचा सामना करण्याकरीता आरोग्य व्यवस्थापन व पोलीस प्रशासन जीवाचे रान करून आपआपल्या पद्धतीने अत्यंत चांगले काम करतांना दिसत आहे. परंतु अजुनही खेड्यापाड्यांमध्ये, वस्ती, तांड्यामध्ये अजूनही प्रशासनाला काम करताना मनुष्यबळ किंवा त्या त्या खात्याच्या अधिकार्यांची कमी भासत आहे. अधिकारी, कर्मचारी कमी असल्यामुळे कोरोना संसर्गावर प्रतिबंध घालतांना किंवा कोरोना पिडीतांनावर उपचार करतांना प्रचंड अडचणी येत आहेत. आपण या राज्याचे वनमंत्री आहे व आपल्या वन विभागात उपविभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक यासारखे अनेक अधिकारी, कर्मचारी आहेत. ज्यांना पोलीस प्रशासनाप्रमाणे खाकी वर्दी सुद्धा आहे. प्रादेशिक विभाग, वन्यजीव फिरते पथक, सामाजिक वन विभाग अशा विभागात अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांना आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आदेश करावे. जेणेकरून या दोन्ही विभागांना या लॉकडाऊनमध्ये सहकार्य होईल व जनतासुद्धा लॉकडाऊनच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करेल. तरी आपल्या अखत्यारीतील वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांना देशसेवेच्या या कार्यात मदत करण्याचे आपल्या स्तरावरून आदेशित करावे अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
