अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्या वाहनांना मिळणार स्टिकर्स
वाशिम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात नियंत्रण कक्ष
वाशिम, दि. 26 : जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरु राहण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्या वाहनांना परिवहन विभागामार्फत स्टिकर्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत वाहतूकदारांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहतुकदारांनी स्टिकर्स प्राप्त करून घेवून आपल्या वाहनांच्या दर्शनी भागावर लावावीत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीविषयी वाहतूकदारांना येणार्या अडचणी सोडविण्यासाठी वाशिम उपप्रादेशिक परिवहन कार्यलयात नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला असून हा नियंत्रण कक्ष 24 तास सुरु राहणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी कळविले आहे.
जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणार्या वाहतूकदारांना संबंधित प्रादेशिक कार्यालयाकडून स्टिकर्स पुरविली जाणार आहेत. वाहनाच्या चालकांना तसेच माल भरणारे, उतरविणारे कामगार यांना, त्यांच्या घरापासून वाहनापर्यंत तसेच वाहतुकीचे काम पूर्ण झाल्यानंतर घरापर्यंत जाण्यासाठी जर एखादी जीप, कार अशा वाहनांचा वापर वाहतूकदार करीत असतील तर या वाहतुकीला सुद्धा अत्यावश्यक सेवा समजून त्यासाठी स्टिकर्स दिले जातील. या संदर्भात वाहतुकदारांनी अशा चालकांना, कामगारांना ओळखपत्र पुरवावे किंवा संघटनेच्या लेटरहेडवर अशा व्यक्तींची नावे नमूद करून सदर वाहनात ठेवावीत. या वाहतुकीसाठी परिवहन अथवा पोलीस विभाग आवश्यक सहकार्य करेल.
ज्या गोदामांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यात आला आहे, अशा गोदामांपर्यंतची किंवा गोदामापासून बाहेर जाणारी वाहतूक देखील आवश्यक वाहतूक समजण्यात येईल व या संदर्भाने आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसंदर्भात वाहतूकदारांना येणार्या अडचणींचे निवारण करण्यासाठी वाशिम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. हा नियंत्रण कक्ष 24 तास सुरु राहणार असून 8668844700 अथवा 7709358777 या क्रमांकावर अथवा ाह37ऽारहरींीरपीलेा.ळप या ई-मेलवर वाहतूकदार आपल्या अडचणी मांडू शकतात, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती सय्यद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ