Ticker

6/recent/ticker-posts

कोरोना पिडीतांच्या मदतीसाठी खा.गवळी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला 50 लाखाचा विकासनिधी


राज्यातील कोरोना पिडीतांच्या मदतीसाठी खा.गवळी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला 50 लाखाचा विकासनिधी
वाशिम - राज्यातील कोरोना बाधीत पिडीतांना सर्व वैद्यकीय उपचार सुविधा पुरविण्यासाठी स्थानिक विकास निधी अंतर्गत 50 लाख रुपयाचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला असल्याची माहिती खा. भावना गवळी यांनी 26 मार्च रोजी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
 वाशिम - यवतमाळ लोकसभा मतदार संधाच्या खासदार भावना गवळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठविले असून सदर पत्रात संपूर्ण राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच पिडीतांना अत्यावश्यक सर्व वैद्यकीय उपचार सुविधा पुरविण्यासाठी आपण आपल्या मतदार संघातील स्थानिक खासदार निधी अंतर्गत 50 लक्ष रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देत असल्याचे म्हटले आहे. सदर 50 लक्ष रुपयाचे निधी राज्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वर्ग करण्याबाबतचे पत्र वाशिम जिल्हाधिकारी यांना दिल्याचे खासदार गवळी यांना मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे. तसेच संपूर्ण देशात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले असून या विषाणुचे गांभीर्य लक्षात घेवुन महाराष्ट्राच्या संकट काळात राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने मा. उध्दव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात कलम 144 लागु करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांचे कौतुकही खा. गवळी यांनी केले आहे.