Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस बांधवांना लॉकडाऊन मुदतीपर्यत भोजन, पाणी व हॅन्डवॉशची व्यवस्था : भाजपा युवा मोर्चा व राजु पाटील राजे मित्रमंडळाची मानवसेवा


भाजपा युवा मोर्चा व राजु पाटील राजे मित्रमंडळाची मानवसेवा
पोलीस बांधवांना लॉकडाऊन मुदतीपर्यत भोजन, पाणी व हॅन्डवॉशची व्यवस्था
वाशीम - देव हा शब्द श्रध्देचा विषय आहे. खरा देव हा मानवाच्या ह्दयात वसलेला आहे हे संतांनी वेळोवेळी सांगीतलेले आहे. केवळ कठीण प्रसंगी माणसातील दैवी अनुभूतीचा अनुभव येत असतो. देशावर कोसळलेल्या करोना आपत्तीच्या कठीण प्रसंगी आज देशातील विविध पक्ष, विविध सामाजीक संघटना, स्वयंसेवी संस्था, समाजसेवी नागरीक आपआपल्या परीने पिडीतांना, डॉक्टरांना, पोलीसांना जमेल तेवढी मदत करीत आहेत. डॉक्टर्स व पोलीस बांधव भगिनी सुध्दा आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या संरक्षणासाठी 24 तास सेवा देत आहेत. अशा कठीण प्रसंगी रस्त्यावर कुठेही पाणी प्यायला किंवा खायला एकही दुकान उघडे नाही. पिण्याच्या पाण्यासाठी जीव कासाविस होतो. पोटात भुकेचा आगडोंब उठते. मात्र देशसेवेचे व्रत हाती घेतलेले हे निधड्या छातीचे विर पोलीस बांधव व भगिनी तहानभूकेची तमा न बाळगता डोळ्यात तेल घालून लॉकडाऊनची अंमलबजावणी करतांना दिसत आहेत.  या पोलीस बांधवांप्रती आपलेही काही उत्तरदायित्व लागते, नव्हे हेच खरे माणसातील देव आहेत या सर्वोच्च विचाराने प्रेरीत होवून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व राजु पाटील राजे मित्रमंडळ मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. 14 एप्रिलपर्यत शहरातील संपूर्ण लॉकडाऊनची यशस्वीपणे अंमलबजावणी होईपर्यत शहरातील या पोलीस बांधव व भगिनींना भोजन, थंड पाणी व हॅन्डवॉशची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना आपत्तीच्या प्रसंगी अनेक जण खारीचा वाटा उचलून जमेल तेवढी मदत करुन आपला माणूसकीचा धर्म जोपासत आहेत. अशा कठीण प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजु पाटील राजे यांच्या पुढाकारातून हा समाजसेवी उपक्रम सुरु करण्यात आला असून शहरातील पोलीस बांधव व भगिनींना भोजन, पाणी व हॅन्डवॉशच्या व्यवस्थेसाठी संतोष शिंदे, सुनिल, कपिल सारडा, गजानन खटके, कैलास मुगवानकर, शिव गाडेकर, बालाजी पाटील, रामभाऊ देव आदी समाजसेवी युवक परिश्रम घेत आहेत.