संकटकाळी पत्रकारही धावले महाराष्ट्राच्या मदतीला
जेष्ठ पत्रकार राजेंद्र मानधना यांची सीएम रिलीफ फंडात 21 हजाराची मदत
करोना पिडीतांच्या उपचारासाठी घेतला निर्णय
जिव धोक्यात घालून वार्तांकन करणार्या पत्रकारांना सुरक्षा कीट द्या - मानधना
वाशिम, 30 मार्च - करोना या जागतीक महामारीचा सामना महाराष्ट्र करत असतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेला केलेल्या आर्थिक मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देवून येथील येथील दैनिक हा माझा देशचे संपादक व जेष्ठ पत्रकार राजेंद्र मानधना यांनी प्रतिसाद देत 21 हजार रुपयाची आर्थिक मदत धनादेशाच्या स्वरुपात सीएम रिलीफ फंडामध्ये जमा केली आहे. या मदतीमुळे राज्यातील करोना पिडीतांवर उपचार आणि त्यांना चांगली आरोग्य सेवा देणे शक्य होणार असून आपल्याप्रमाणेच नागरीकांनी खारीचा वाटा उचलून शक्य तेवढी आर्थीक मदत देवून देशाप्रती आपली एकजुट दाखविण्याचे आवाहनही यावेळी राजेंद्र मानधना यांनी केले आहे. यासोबतच महाराष्ट्रावर कोसळलेल्या या संकटाचे अपडेट जनतेला देण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून वार्तांकन करणार्या सर्व स्तरातील पत्रकारांना शासनाने करोना सुरक्षा किट देण्याची मागणीही यावेळी मानधना यांनी केली आहे.
करोना महामारीच्या च्या रुपाने देशावर मोठे संकट कोसळले आहे. या संकटाचा सामना शासन व प्रशासनातील सर्व घटक अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांवर उपचार करण्याठी कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत. अशा कठीण प्रसंगी देशाला आर्थीक मदतीची गरज असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरीकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. यासोबतच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुध्दा राज्यातील नागरीकांना सीएम रिलीफ फंडात आपले योगदान देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत असून समाजातील सर्व घटक आपआपल्या परीने आर्थिक मदत देत आहेत. सर्वसामान्य घटकांसोबतच पत्रकारही या मदतीत पुढे येत असून महाराष्ट्रातील अनेक पत्रकार बांधव आपआपल्या परीने आर्थिक, अन्नदान व इतर स्वरुपात मदत देण्यासाठी पुढे येत आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला जिल्हयात सर्वप्रथम येथील समाजसेवी डॉ. माधव हिवाळे यांनी प्रतिसाद देवून 11 हजाराची मदत दिली होती. त्यानंतर जिल्ह्यात दानशुर नागरीक मदतीसाठी मोठ्या प्रमाणात पुढे येवून आपआपल्या परीने संकटकाळी देश वाचविण्यासाठी मदतीचे योगदान देत आहेत.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ