वाशिम, दि. ०२ (जिमाका) : पोहरादेवी येथे दरवर्षी गुरुपौर्णिमेला यात्रा भरते. याकरिता मोठ्या संख्येने भाविक येतात. मात्र, यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाचे संकट असल्याने पोहरादेवी येथे ५ जुलै रोजी गुरुपोर्णिमेला गर्दी होवू नये, यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पोहरादेवी, उमरी बु. कडे जाणारे सात वाहतूक मार्ग ४ जुलै २०२० पासून बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून गर्दी, यात्रा, मेळावे यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोहरादेवी, उमरी खुर्द येथे ५ जुलै रोजी होणाऱ्या गुरु पौर्णिमेला गर्दी होवू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१)(ख) नुसार ४ जुलै ते ७ जुलै २०२० या कालावधीत पोहरादेवीकडे जाणारे ७ मार्ग यात्रेकरूंसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी श्री. मोडक यांनी दिले आहेत.
बंद करण्यात येणारे मार्ग खालीलप्रमाणे आहेत
१. धानोरा (ता. मंगरूळपीर)-शेंदूरजना-फुलउमरी व पोहरादेवी
२. पोहरादेवी ते सिंगद मार्ग
३. पोहरादेवी ते सावळी (पांदन रस्ता) मार्ग
४. पोहरादेवी -पंचाळा फाटा-मानोरा मार्ग
५. भाक्तीधाम ते पोहरादेवी जवळ उमरी रोड मार्ग
६. पोहरादेवी प्रवेशद्वार (वाईगौळ रस्ता) मार्ग
७. किसनराव हायस्कूल जवळ आमकिन्ही रोड
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ