वाशिम, दि. ०२ (जिमाका) : तणनाशके ही अल्कधर्मी असल्यामुळे फवारणीकरिता वापर करीत असलेले पाणी आम्लधर्मी म्हणजेच पाण्याचा सामू (पीएच) ३ ते ६ असणे आवश्यक आहे. फवारणीकरिता गढूळ पाणी अजिबात वापरू नये. फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा सामू ६ पेक्षा जास्त असल्यास तणनाशके अशा पाण्याच्या संपर्कात आल्याबरोबर तणनाशकातील घटकाची क्रियाशीलता कमी होते. त्यामुळे अपेक्षित प्रमाणात तण नियंत्रण होत नाही व शेतकऱ्यांनी फवारणीवर केलेला खर्च वाया जातो, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली आहे.
वाशिम जिल्ह्यातील भूजल पाण्याच्या माहितीनुसार जिल्ह्यातील जमिनीखाली उपलब्ध असणारे पाणी हे आम्लधर्मी आहे. पाण्याचा सामू कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या म्युरॅटिक अॅसिड किंवा सोडियम बायसल्फेट या औषधांचा वापर करून लिटमस पेपरद्वारे तपासून पाण्याचा सामू ३ ते ६ इतका राहील, असे पाहावे. सदरचे औषध उपलब्ध न झाल्यास स्थानिक परिस्थितीत फवारणीचे द्रावण करताना पाण्यामध्ये लिंबाचा रस पिळून सामू ६ पेक्षा कमी असल्याची खात्री लिटमस पेपरद्वारे करूनच फवारणीसाठी पाण्याचा वापर करावा, असे त्यांनी म्हटले आहे.
तणाचा प्रादुर्भाव जास्त असेल तरच तणनाशक वापरा
सोयाबीन पिकाची ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी यंत्राच्या नळ्या चुकीच्या पद्धतीने लावून पेरणी केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खत २ ते ३ से. मी. खोलीवर व बियाणे ५ ते १० से.मी. व त्यापेक्षाही खोलीवर पेरल्या गेले. जमिनीच्या वरच्या थरातील तणाच्या बियाणाची पावसामुळे उगवण झाल्याने, तसेच वरच्या थरात पडलेले रासायनिक खत मुख्य पिकाऐवजी तणाला मिळत असल्याने तणाची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे मुख्य पिकास खत उपलब्ध होत नाही. तसेच उगवणाऱ्या पिकाच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. जलदगतीने उगवलेल्या तणाचा बंदोबस्त करण्यासाठी शक्यतोवर शेतकऱ्यांनी कोळपणी व निंदणीद्वारे तण नियंत्रण करावे. तणाचा प्रादुर्भाव जास्त असेल तरच तणनाशकाचा वापर करावा.
सततच्या तणनाशकाच्या वापरामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंचा नाश होवून जमिनीचा पोत, सामू, विद्युत वाहकता, कर्ब व नत्राचे प्रमाण इत्यादीवर परिणाम होत असल्यामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो. मोठ्या प्रमाणावर तणाचा प्रादुर्भाव असल्यास उगवणीनंतरचे (पोस्ट इमर्जन्स) तणनाशक (पीक ७ ते २१ दिवसाचे असताना) फवारणीकरिता वापरावे. उगवणीपुर्व तणनाशकाची फवारणी केली असल्यास उगवणीनंतर शिफारस केलेल्या तणनाशकाची फवारणी करू नये. कारण उगवणी पूर्वी अथवा उगवणीनंतर केलेल्या तणनाशक फवारणीचा परिणाम ४५ दिवसांपर्यंत राहतो.
तणनाशक फवारणीकरिता स्वतंत्र पंप वापरावा, उगवणी पूर्व तणनाशक फवारणीकरिता वापरलेला पंप पुन्हा वापरतांना स्वच्छ करावा. तसेच कीटकनाशक फवारणीकरिता वापरलेला पंप तणनाशक फवारणीकरिता वापरू नये. शक्यतोवर फवारणी वारा शांत असतांना सकाळी किंवा सायंकाळी करावी, कारण यावेळी पानावरील छिद्रे जास्त प्रमाणात उघडलेली असतात. त्याद्वारे फवारणीचे द्रावण तणाकडून जास्त प्रमाणात शोषले जाते व त्यामुळे प्रभावी तण नियंत्रण होते, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली आहे.
विषबाधा टाळण्यासाठी फवारणी करताना काळजी घ्या
फवारणी करणारा व्यक्ती निर्व्यसनी असावा. त्या व्यक्तीने फवारणीच्या अगोदरच्या दिवशी मद्यपान, धुम्रपान, केलेले नसावे. फवारणी करणाऱ्या व्यक्तीने सुरक्षा कवच (सेफ्टी कीट) परिधान करूनच फवारणी करावी. तणनाशक फवारणी करतांना ज्या तणनाशकाची शिफारस विशिष्ट पिकासाठी केलेली आहे, त्याच पिकामध्ये फवारणी करावी अन्यथा इतर पिकांमध्ये फवारणी केल्यास पिकांचे नुकसान होवू शकते. पॉवर स्पेअर किंवा ट्रॅक्टरवरील पंपाने फवारणी करणे अत्यंत चुकीचे असून तणनाशक फवारणीकरिता नॅपसॅक स्प्रे पंपाचाच वापर करावा.
हेक्टरी ५०० लिटर पाण्यातील द्रावणाची फवारणी करा
बहुतेक शेतकरी पॉवर स्प्रे पंपाद्वारे फवारणीसाठी हेक्टरी १२५ ते १५० लिटरच द्रावण वापरतात. त्यामुळे संपूर्ण एक हेक्टरवर पुरेशा प्रमाणात फवारणी होत नसल्याने त्याचा अपेक्षित फायदा होत नाही. एक हेक्टर क्षेत्राकरिता किमान ५०० लिटर पाण्यातील द्रावण फवारणीसाठी वापरणे आवश्यकच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नॅपसॅक स्प्रे पंपाचा वापर करून हेक्टरी ५०० लिटर पाण्यातील द्रावणाची फवारणी करावी.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ