Ticker

6/recent/ticker-posts

शहरातील खंडीत झालेली निर्जंतुकीकरण सुविधा त्वरीत सुरु करा : फवारणी नसल्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका : मनसेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


शहरातील खंडीत झालेली निर्जंतुकीकरण सुविधा त्वरीत सुरु करा
फवारणी नसल्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका : मनसेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
वाशीम - कोरोना संसर्ग रोखण्याकरीता शहरामध्ये निरर्जंतुकीकरण करण्याकरीता करण्यात आलेली  सुविधा गेल्या अनेक दिवसापासून खंडीत करण्यात आली असून यासोबतच शहरातील विविध प्रभागामध्ये नियमित फवारणीही करण्यात येत नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कायम असून शहरातील नागरीकांना कोरोनापासून वाचविण्यासाठी मुख्य चौकांमध्ये खंडीत झालेल्या निर्जंतुकीकरण सुविधेसह नियमित फवारणीचा कार्यक्रम सुरु ठेवण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या वतीने २ जुलै रोजी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.
 निवेदनात नमूद आहे की, मुळ वाशीम शहर व विस्तारीत वाशीम शहर या लोकसंख्येचा विचार करुन नव्याने सुरु करण्यात आलेल्या बाजाराच्या ठिकाणमध्ये व गर्दीच्या चौकामध्ये निर्जंतुकीकरण कक्ष व निरर्जंतुकीकरण करण्यासाठी हॅन्डवॉश व टाकी ठेवण्यात आली होती. तसेच शहरातील फवारणीचा कार्यक्रम सुरु करण्यात आला होता. परंतु दोन महिन्यापासून ही व्यवस्था खंडीत झालेली आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचे पुरेसे लक्ष नाही. तसेच कोणाच्या आदेशाने या सेवा खंडीत करण्यात आल्या आहेत. हेही कळेनासे झाले आहे. त्यामुळे शहरात कोरोना संसर्गाचा धोका कायम असुन नागरीकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तरी या सेवा सुरळीत करण्याबाबत तसेच कोरोना संपेपर्यत सुरु ठेवण्याबाबत स्थानिक नगर पालीका प्रशासनाला त्वरीत सुचना देण्यात याव्यात अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर मनविसे जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, माजी कृषी जिल्हाध्यक्ष अशोक नाईकवाडे, परशराम दंडे, अनिल भगत, विठ्ठल राठोड, लक्ष्मण राऊत, अमोल मुळे, राहुल इंगोले आदींच्या सह्या आहेत.