वाशीम - शहरातील विविध रस्त्यावर खड्डे पडले असून यामुळे रहदारीला विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय भूमिगत गटार योजना झाल्यानंतर त्याठिकाणी अद्यापही नविन रस्ते बनविण्यात आले नाहीत. त्यामुळे नागरीकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरीकांना होणारा त्रास पाहता रस्त्यावरील खड्डयांची दुुरुस्ती व रस्त्याच्या नविनीकरणाचे काम सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मनसेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या पुढाकारात ३ जुलै रोजी नगर परिषद मुख्याधिकार्यांना करण्यात आली असून रस्त्याचे काम तातडीने सुरु न केल्यास खड्डयांचे वर्षश्राध्द करुन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद आहे की, वाशीम शहरामध्ये सध्यस्थितीत असलेल्या रस्त्याची वाहनाच्या/जड वाहनाच्या फेर्यामुळे तसेच नागरीकांच्या रहदारीमुळे दुरावस्था झालेलीे आहे. बर्याच रस्त्यांवर वारंवार होणार्या खोदकामामुळे खड्डे पडले आहेत. याबाबत नागरीकांना होणारा त्रास पाहता सदर रस्त्यातील खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती न करता कायमस्वरुपी दुरुस्ती करावी तसेच अनेक ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम झाले असले तरी या ठिकाणी नव्याने रस्ते अद्यापही बनविण्यात आले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी त्वरीत नविन रस्ते बनविण्यात यावे.
दुरुस्ती व नविनीकरण अत्यावश्यक असलेल्या रस्त्यामध्ये पाटणी चौक ते अकोला नाका, हिंगोली नाका ते स्टेशन रोड, लॉयन्स विद्यानिकेतन ते श्रावस्तीनगर, मन्नासिंह चौक ते राजनी चौक, पुसद नाका ते मन्नासिंह चौक, मन्नासिंह चौक ते राघोबा मंदिरापर्यत, शनीमंदीर ते काळे फाईल, दंडे चौक ते दिघेवाडीपर्यत, अग्रसेन चौक (जुनी नगर परिषद) ते गुरुवार बाजार पर्यत, टिळक चौक ते दंडे चौकापर्यत (जुन्या पोस्ट ऑफीसची गल्ली, महात्मा फुले भाजी मार्केटमधील रस्ता, गजानन नगर ते लोनसुने लेआऊटकडे जाणारा रस्ता यासह शहरातील विविध ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे व नविनीकरणाची कामे आदींचा समावेश आहे. शहरातील विविध ठिकाणी प्रलंबित असलेल्या रस्त्यांची कायमस्वरुपी दुुरुस्ती व नविनीकरणाची कामाची कार्यवाही सात दिवसाच्या आत सुरु न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खड्डयांचे वर्षश्राध्द करुन नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर मनविसे जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, माजी कृषी जिल्हाध्यक्ष अशोक नाईकवाडे, गजानन वैरागडे, अमोल गाभणे, मंगेश सारसकर, परशराम दंडे, अनिल भगत, विठ्ठल राठोड, लक्ष्मण राऊत, अमोल मुळे, राहुल इंगोले आदींच्या सह्या आहेत.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ