कोरोना काळात जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाचे कार्य कौतुकास्पद
व्यापारी युवा मंडळाने व्यक्त केली कृतज्ञता
सावधगिरीने व्यापार करण्याचा जिल्हाधिकार्यांचा सल्ला
वाशिम - कोरोना संकटाच्या निवारणासाठी २४ मार्चपासून जिल्हयात सुरु झालेल्या लॉकडाऊन दरम्यान जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने दुहेरी दायित्व सांभाळून जिल्ह्यात ठेवलेला कमाल चोख बंदोबस्त आणि त्या अनुषंगाने नागरीकांच्या सुरक्षेची यशस्वीपणे सांभाळलेली जबाबदारी यामुळे ४ मे पर्यत वाशीम जिल्हा पुर्णपणे कोरोनामुक्त होता. या काळात जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने बजावलेल्या कार्याप्रती आपली सामाजीक संवेदना व्यक्त करण्यासाठी व्यापारी युवा मंडळाच्या शिष्टमंडळाने २० जुन रोजी जिल्हाधिकारी ह्षीकेश मोडक व जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांची भेट घेतली व त्यांच्या कार्याची प्रशंसा करुन व्यापारी वर्ग आणि समस्त वाशीमकरांच्या वतीने त्यांचे आभार मानले. या शिष्टमंडळात व्यापारी युवा मंडळाचे मार्गदर्शक विवेक पाटणी, अध्यक्ष आनंद चरखा, उपाध्यक्ष जितेंद्र छाबडा, नंदकिशोर पाटील, कोषाध्यक्ष गिरीष अग्रवाल, जिल्हा प्रवक्ता गोविंद वर्मा, पीआरओ रवि बज, बॉबी गुलाटी, वसंता परळकर, दिलीप केसवाणी, पप्पु गोधा, शाम नेनवाणी, राजेश लढ्ढा, आशिष ठाकुर, प्रेम वर्मा, हरिष ओंधीया यांचा सहभाग होता.
भेटीदरम्यान व्यापारी युवा मंडळाचे अध्यक्ष आनंद चरखा यांनी मंडळाच्या वतीने श्री मोडक व श्री परदेशी यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी कृतज्ञता व्यक्त करतांना जिल्हा प्रवक्ता गोविंद वर्मा म्हणाले की, संपूर्ण जग सध्या कोरोना साथीच्या आजाराने ग्रस्त आहे. आपला वाशिम जिल्हा १० दिवसांपूर्वी पर्यंत कोरोना मुक्त सारखाच होता आणि म्हणूनच जिल्हा प्रशासनाने आम्हाला ४ मे पासून व्यापारी दुकाने सुरू करण्यास मान्यता दिली. वाशिम जिल्ह्याचा व्यापारी वर्ग भाग्यवान आहे की, ज्या वेळी संपूर्ण भारतात पहिल्यांदा काही बाजारपेठा उघडल्या त्या वेळी आम्हाला वाशीम जिल्ह्यात व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली. जिल्हा प्रशासनाने दिवसरात्र अविरत प्रयत्न केले. याबद्दल व्यापारी युवा मंडळाच्या वतीने जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासनाला कृतज्ञता पत्र देण्यात आले. योबतच जिल्हयात इतर व्यापारी दुकानांसोबतच सलून, पाणीपुरी, पानशॉप, ब्युटी पार्लर, चहा, स्नॅक शॉप, रेस्टॉरंट इत्यादी लहान व्यवसायीकांना आपले व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती व्यापारी युवा मंडळाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना करण्यात आली. यावर जिल्हाधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून व्यापारी वर्गाने वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अधिक सावधगिरीने व साथरोगाच्या सर्व नियमांचे पालन करुन आपला व्यापार सुरक्षीतपणे करण्याचा सल्ला दिला. जिल्हयातून कोरोना संकट हद्दपार करण्यासाठी यापुढेही व्यापारी युवा मंडळ शासन, प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या सोबत राहील अशी ग्वाही जिल्हा प्रवक्ता गोविंद वर्मा यांनी दिले.
चौकट ----------------------------
बाहेरुन आलेल्या व्यक्तींनी स्वत:हून आरोग्य केंद्रात तपासणी करावी - आनंद चरखा
लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्यानंतर दिल्ली, मुंबई, नागपूर यासह इतर राज्यातून अनेक अडकलेले नागरीक जिल्हयात परत येत आहेत. या स्थलांतरीत व्यक्तींनी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी जिल्हयात प्रवेश करते वेळेस स्वत:हून जवळच्या आरोग्य केंद्रात जावून आपली तपासणी करुन घ्यावी असे आवाहन यावेळी व्यापारी युवा मंडळाचे अध्यक्ष आनंद चरखा यांनी केले.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ