Ticker

6/recent/ticker-posts

कळंबा महाली व पार्डी सर्कलमध्ये फेस शिल्डचे वितरण : आशा वर्कर व गट प्रवर्तकांना लाभ : जि.प. सदस्या सौ. मिनाक्षी पट्टेबहादूर यांचा पुढाकार : जि.प.अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य


कळंबा महाली व पार्डी सर्कलमध्ये फेस शिल्डचे वितरण : आशा वर्कर व गट प्रवर्तकांना लाभ : जि.प. सदस्या सौ. मिनाक्षी पट्टेबहादूर यांचा पुढाकार : जि.प.अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य
वाशीम - जि.प. अध्यक्षा तथा रा.काँ. जिल्हाध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून जि.प. सदस्या सौ. मिनाक्षी पट्टेबहादूर यांच्या सामाजीक जाणीवेतून कळंबा महाली व पार्डी टकमोर सर्कलमधील आशा वर्कर व गटप्रवर्तकांना कोरोना महामारीत बहुउपयोगी पडणार्‍या फेसशिल्ड (सुरक्षा आवरण) वितरणाचा उपक्रम घेण्यात आला.
 सामाजीक अंतराचे भान ठेवून पार पडलेल्या या उपक्रमात बोलतांना सौ. पट्टेबहादूर म्हणाल्या की, कोरोना महामारीत जनतेचा जीव वाचविण्यासाठी ग्राम स्तरावर अहोरात्र सेवा देणार्‍या आशा वर्कर व गटप्रवर्तकांची सेवा ही लाखमोलाची असून त्यांचे हे सेवाभावी कार्य इतरांना सदैव प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याप्रती कृतज्ञता म्हणून सामाजीक जाणीवेतून हा उपक्रम घेण्यात येत आहे.
 या कार्यक्रमाला जि. प. सदस्या सरस्वती मोहन चौधरी, पं. स. सदस्या विद्याताई खडसे, रा.काँ. सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विनोद पट्टेबहादूर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष दीपक खडसे, सामाजिक कार्यकर्ते मोहन चौधरी, गटप्रवर्तक शेळके मॅडम यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाला परिसरातील आशा वर्कर व गट प्रवर्तकाची उपस्थिती होती.