गुड न्युज : वाशीम जिल्हयातील ते सहा नमुनेही निगेटीव्ह
वाशीम - मुंबई, पुण्यासह राज्यातील प्रत्येक जिल्हयात कमीअधिक प्रमाणात कोरोनाचे पॉझीटीव्ह रुग्ण मिळत आहेत. त्यातच मरकज प्रकरणातुन वाशीम जिल्हयातील ग्राम मेडशी येथे एक कोरोनाचा पॉझीटीव्ह रुग्ण मिळाल्याने जिल्हावासीयांनी कमालीची धास्ती घेतली होती. त्यानंतर जिल्हयातून आजपर्यत एकूण पाठविलेल्या 23 संशयीत नमुन्यापैकी काल दि. 7 एप्रिलपर्यत 16 नमुने निगेटीव्ह आले होते. व उर्वरीत 6 नमुन्यांचे अहवाल येणे प्रलंबित होते. आज 8 एप्रिल रोजी उर्वरीत 6 नमुन्यांचे अहवालही जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून हे सर्व सहाही नमुने निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे आजपर्यत वाशीम जिल्ह्यात केवळ एकच कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण असून त्याव्यतीरिक्त पाठविलेल्या उर्वरीत 22 रुग्णांचे नमुने निगेटीव्ह आल्याने जिल्हावासीयांच्या आनंदात भर पडली आहे. नाही नाही म्हणता म्हणता जिल्हयात एका कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांच्या रुपाने कोरोनाने जिल्हयात खाते उघडल्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरेाग्य विभागही हायअर्लट मोडवर आला आहे. लॉकडाऊन संदर्भात महाराष्ट्र शासनाने विविध कठोर निर्णय घेतले असले तरी त्या त्या जिल्हयाची स्थिती पाहून जिल्हाधिकार्यांना योग्य ते निर्णय घेण्याची मुभा शासनाने दिली आहे. त्यानुसार जिल्ह्याचे खंबीर कर्णधार जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी वाशीम जिल्हा हायअलर्ट रिस्कवर ठेवून जिल्हयातील नागरीकांनी घराबाहेर पडू नये म्हणून किराणा दुकानांसह बँकांचे कामकाजही सकाळी 8 ते 12 पर्यतच ठेवले आहे. यासोबतच अत्यावश्यक सेवा म्हणून दवाखाने, हॉस्पीटल व मेडीकल दुकानांना यामधुन सुट देण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांच्या या कठोर निर्णयाचे चांगले परिणाम जिल्हयात दिसून येत असून दुपारी 12 नंतर जिल्हयातील शहर, तालुका व ग्रामीण भागातील सर्व रस्ते सामसुम होत आहेत. एकूणच जिल्हयातून तपासणीसाठी आजपर्यत पाठविलेले उर्वरीत 22 नमुनेही निगेटीव्ह आल्याने नागरीकांमध्ये जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाच्या कामकाजाप्रती समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
