Ticker

6/recent/ticker-posts

महामानवांच्या जयंतीसाठी जमा झालेली वर्गणी कोरोनाबाधीत गरजूंसाठी वापरा : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचे भावनिक आवाहन


महामानवांच्या जयंतीसाठी जमा झालेली वर्गणी कोरोनाबाधीत गरजूंसाठी वापरा : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
पुणे : कोरोना विषाणूच्या हल्ल्यामुळे निम्मे जग आजघडीला बंद झाले असतांना देशात कोरोना व्हायरचे वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेवून यावर्षीची 14 एप्रिल रोजी असणारी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही नागरीकांनी आपआपल्या घरातच साजरा करावी. यासोबतच डॉ. आंबेडकर जयंतीची जमा झालेली वर्गणी कार्यकर्त्यांनी कोरोना बाधीत गरजूंसाठी वापरावी असं भावनिक आवाहन डॉ. बाबासाहेबांचे वारसदार आणि वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केल्याचे वृत्त महाराष्ट्र टुडे या प्रसारमाध्यमात प्रसारीत झाले आहे. दरम्यान, भारतात कोरोनाची साथ अद्याप दुसर्‍या टप्प्यात पोहचली आहे. याचा अर्थ ही साथ कम्युनिटी स्प्रेडच्या स्वरूपात पसरलेली नाही. पण एम्स च्या संचालकांनी मुंबईसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. काही आंबेडकरी अनुयायांनी आंबेडकर जयंती साजरी करण्याची तयारी केली होती. परंतु महाराष्ट्रातला कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता आंबेडकरी अनुयायांनी जयंतीच्या नावाखाली अजिबात घराबाहेर पडू नये असेही प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केले आहे.