गोरगरीब कुटुंब व गटई कामगारांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तु व भाजीपाल्याचे वाटप
जेष्ठ समाजसेवक लॉ. वसंतराव धाडवे यांचा पुढाकार
वारा जहांगीर व वाशीम येथील गरीब कुटुंबांना मिळाला लाभ
वाशीम - कोरोना संसर्गामुळे जिल्हयात घोषीत झालेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमिवर हातावर पोट असलेल्या वारा जहांगीर येथील गरीब कुटुंबांना तसेच वाशीम येथील चर्मकार समाजातील गोरगरीब कुटुंबासह गटई कामगार आणि इतर निर्धन कुटुंबांना समाजसेवी लॉ. वसंतराव धाडवे यंाच्या वतीने अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तु व भाजीपाल्याचे वाटप करुन त्यांना दिलासा देण्यात आला. यासाठी लॉ. धाडवे यांनी प्रशासनाने दिलेल्या परवानगीनुसार ठराविक दिवस व ठराविक वेळेत एकूण ५७ परिवारांना सामाजीक अंतर राखून मदत वितरीत करण्यात आली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार अजय ढवळे, राम धनगर, देवानंद राजगुरु, वाराचे सरपंच राजु पायघन, जि.प. सदस्या खोरणेताई, पोलीस पाटील रमेश हमाने, किशोर राजे, अतुल घुमसे, शुभम शेगोकार आदींनी बहूमोल सहकार्य केले.
सध्या १५ एप्रिलपर्यत सुरु असलेल्या संपूर्ण संचारबंदीमुळे हातावर पोट असलेल्या अनेकांच्या घरच्या चुली विझल्या आहेत. रोजखर्चासह दवाखाना व इतर खर्चाची जुळवाजुळव कशी करायची हा प्रश्न या गरीब कुटुंबापुढे उभा ठाकला आहे. अशा भिषण परिस्थितीत समाजातील अनेक लोक देवदुत बनून या कुटुंबाच्या मदतीसाठी धावून येत आहेत. व आपल्या परिने त्यांना यथाशक्ती शक्य ती मदत करीत आहेत. या मदतीमुळे या कुटुंबांतील व्यक्तींच्या जीवनाला मोठी उभारी मिळत असून काही दिवस तरी त्यांच्या घरची चुल विझणार नाही याची शाश्वती निर्माण झाली आहे.
लॉकडाऊनमुळे गोरगरीबांपुढे उद्भवलेल्या या विदारक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून रंजल्यागांजल्यात देव पाहणारे व समाजकार्यात अग्रेसर असणारे जेष्ठ समाजसेवक लॉ. वसंतराव धाडवे यांच्याकडून रस्त्यावर बुटपॉलिश करणारे चर्मकार बांधव, हॉटेलमध्ये काम करणारे मजूर, तीनचाकी सायकलने मालवाहकाचे काम करणारे हमाल यांच्यासह ज्यांचे केवळ हातावर पोट आहे अशा अनेक कुटुबांना अन्नधान्य, जिवनावश्यक वस्तु व भाजीपाल्याच्या रुपाने मदतीचा हात देण्यात आला. या मदतीमध्ये तालुक्यातील वारा जहांगीर या त्यांच्या मुळ गावातील जवळपास ३२ कुटुंबांसह वाशीम शहरातील एकूण २५ गटई कामगारांच्या कुटुंबांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तु व भाजीपाल्याचे वितरण लॉ. वसंतराव धाडवे यांच्या हस्ते करुन अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या या कुटुबांना धीर देण्यात आला. याआधी लॉ. धाडवे यांनी तब्बल १० हजार माहितीपत्रकाचे जिल्हयात वाटप करोना आजाराविषयी जनतेत जनजागृती केली आहे. यासह लॉ. धाडवे यांच्याकडून शहरातील गणेशमंडळांना दरवर्षी वितरीत केलेल्या फुलपाकळ्याव्दारे गुलालविरहीत गणेशोत्सव साजरा करुन सामाजीक सलोखा कायम राखला जातो. सोबतच आपल्या वाढदिवसदिनी आरोग्य शिबीरे राबवून त्यांनी अनेकांची मोफत आरोग्य तपासणी, मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीरे यशस्वीपणे राबवून अनेकांच्या जीवनात प्रकाशाची नवी पहाट उजाडली आहे. यासोबतच विद्या़र्थ्यांना शैक्षणिक साहित्य, अपंगांना तीनचाकी सायकल वाटप व गरीब महिलांना साडीवाटप केले आहे. यावर्षी लॉकडाऊनमुळे २ एप्रिल रोजीचे सर्व उपक्रम पुढे ढकलण्यात आले असून यथायोग्य वेळेत हे उपक्रम राबविण्यात येतील अशी माहिती धाडवे यांनी दिली आहे. धाडवे यांनी आपल्या कार्यातून नेहमी रंजल्या गांजल्यांमध्ये देव पाहण्याचा प्रयत्न केला आहे. या समाजसेवी कार्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातुन कौतूक केले जात आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
