Ticker

6/recent/ticker-posts

चेतन सेवांकुरमधील १५ अंध मुलांच्या आयुष्यात उजाडली आरोग्याची पहाट


चेतन सेवांकुरमधील १५ अंध मुलांच्या आयुष्यात उजाडली आरोग्याची पहाट
तीन वर्ष पुरविल्या जाणार मोफत आरोग्यसेवा
भगवती हॉस्पीटलच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त प्रेरणादायी उपक्रम
वाशीम - उत्तम आरोग्यसेवा, आश्‍वस्त वातावरण, प्रेमळ विचारपूस आणि रुग्ण व डॉक्टरांचे पवित्र नाते जपणार्‍या येथील भगवती हॉस्पीटलच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त डॉ. जीवन नायक यांनी आपले सामाजीक उपक्रमात सलग दुसर्‍यावर्षीही सातत्य कायम राखुन ग्राम केकतउमरा येथील चेतन सेवांकुरच्या १५ अंध मुलांना सलग तीन वर्ष सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा मोफत देण्याचा मानस जाहीर केला आहे.
    मागील वर्षभरात जिल्ह्यातील निराशेच्या गर्तेत सापडलेल्या अनेक रुग्णांना नवा आशेचा किरण ठरलेल्या शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील भगवती हॉस्पीटल ८ एप्रिल रोजी दुसर्‍या वर्षपुर्तीकडे वाटचाल करीत असून भगवती हॉस्पीटल हे उत्तम आरोग्य सेवेमुळे अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण ठरले आहे. आपल्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त बोलतांना डॉ. जीवन नायक म्हणाले की, रुग्णांचे दु:ख निवारण्याचे आम्ही माध्यम बनलो त्याचा आम्हाला आज खरोखर आनंद होत आहे. हे हॉस्पीटल उभारतांना जे स्वप्न आम्ही आणि आमच्या परिवाराने पाहले होते ते स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचे आम्हाला समाधान लाभले आहे. हॉस्पीटलमध्ये सर्व तंत्रज्ञान आणि सुविधा असून हॉस्पीटलच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त एक सामाजीक उपक्रम म्हणून ग्राम केकतउमरा येथील चेतन सेवांकुरच्या १५ अंध मुलांना तीन वर्ष मोफत सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा पुरविण्याचा मानस यावेळी डॉ. नायक यांनी व्यक्त केला.