Ticker

6/recent/ticker-posts

शाळेतील चोरी प्रकरणातील आरोपीस मुद्देमालासह अटक


शाळेतील चोरी प्रकरणातील आरोपीस मुद्देमालासह अटक
वाशीम - शहरातील रेल्वेस्टेशन मागे असलेल्या पंचशिलनगर येथील महर्षी संत गाडगे महाराज शाळेत २९ मार्च रोजी रात्रीदरम्यान झालेल्या चोरी प्रकरणाचा शहर पोलीसांनी छडा लावून या चोरी प्रकरणातील आरोपी हरिष संतोष कांबळे (२२) यास मुद्देमालासह अटक करुन या आरोपीवर शहर पोलीस स्टेशनमध्ये भांदवीच्या कलम ४५७ व ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ३१ मार्च रोजी शाळेचे मुख्याध्यापक नंदु जनार्धन वाघ यांनी तक्रार दाखल केली होती.
 याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचशिल नगर येथील महर्षी संत गाडगे महाराज मराठी प्राथमिक शाळेत २९ मार्चच्या रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने शाळेच्या खिडकीचे ग्रील वाकवून आत प्रवेश केला व शाळेच्या स्टोअररुम मधील तांदुळ, एम्प्लीफायर मशीन, दोन स्पिकर, माईक, केबल, ब्लँकेट व किराणा माल असा एकूण २१ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. सदर गुह्याच्या तपासादरम्यान आरोपी हरिष संतोष कांबळे (वय २२) रा. पंचशिलनगर वाशीम यास ताब्यात घेवून त्याच्याकडून एम्प्लीफायर मशीन, दोन स्पिकर, माईक, केबल असा एकूण १३ हजाराचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक विजयकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, ठाणेदार योगीता भारव्दाज यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय गणेश सरनाईक, नापोकॉ उमाकांत केदारे, प्रशांत अंभोरे, रामेश्‍वर नागरे, विजय शिनगारे, पो.कॉ. ज्ञानदेव मात्रे, पोकॉ. विठ्ठल महाले, मनोज चव्हाण, आनंद चोपडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.