Ticker

6/recent/ticker-posts

जिपोअ श्री वसंत परदेशी यांच्या संकल्पनेतून चार हजार कापडी मास्कची निर्मिती


जिपोअ श्री वसंत परदेशी यांच्या संकल्पनेतून चार हजार कापडी मास्कची निर्मिती
पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड बांधवांना वितरण
वाशीम - कोरोना संसर्गापासून पोलीस बांधवांचा बचाव करण्यासाठी वाशीम जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या संकल्पनेतून तब्बल चार हजार कापडी मास्कच्या निर्मिती करण्यात येत असून धुण्यायोग्य असलेले हे कापडी मास्कचे वितरण पहिल्या टप्प्यात पोलीस अधिक्षक कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांना करण्यात आले.
पोलीस अधिक्षक वाशिम कार्यालयातील पोलीस अधिकारी / कर्मचारी यांना पोलीस अधिक्षक श्री वसंत परदेशी यांचे हस्ते मास्क चे वाटप देशात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी हे तन मन धनाने लढत असुन त्यांचे खांदयाला खांदा लावुन पोलीस विभागातील अधिकारी / कर्मचारी व होमगार्ड सैनिक सुध्दा कोरोना विषाणुशी दोन हात करण्यासाठी रस्त्यावर दिवस रात्र सज्ज आहेत . आपले अधिकारी / कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोलीस अधिक्षक श्री वसंत परदेशी यांनी स्वतःचे कल्पनेतुन 4000 कापडी मास्क तयार करण्याकरीता दिले असुन, पहिल्या टप्यात तयार होवुन मिळालेले कापडी मास्क पोलीस अधिक्षक कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांना प्रत्येकी दोन असे वाटप करण्यात आले . यावेळी पोलीस अधिक्षक श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस अधिक्षक श्री विजयकुमार चव्हाण, पोलीस उपअधिक्षक ( गृह ) श्रीमती मृदला लाड , पोलीस निरिक्षक शिवाजी ठाकरे , श्रीराम घुगे हे उपस्थित होते . तसेच कारंजा उपविभागातील 4 पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कारंजा येथे कार्यरत असलेले अधिकारी / कर्मचारी , होमगार्ड सैनिक यांना प्रत्येकी दोन प्रमाणे पुरतील असे मास्क वाटप करण्यासाठी कारंजा उपविभागास पुरविण्यात आले आहेत. अधिकारी / कर्मचारी व होमगार्ड सैनिक यांना पुरविण्यात आलेले कापडी मास्क हे धुण्यायोग्य असुन दररोज एक स्वच्छ केलेला मास्क वापरण्याच्या सुचना स्वत : पोलीस अधिक्षक वाशिम यांनी अधिकारी / कर्मचारी यांना दिल्या आहेत . उर्वरित मास्क तयार होताच जिल्हयातील मंगरुळपीर व वाशिम उपविभागातील सर्व पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले अधिकारी / कर्मचारी व होमगार्ड कर्मचारी यांना पुरविण्यात येणार असल्याची माहिती जि.पो.अ. परदेशी यांनी दिली.