मानसिक ताण घालविण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईनव्दारे समुपदेशन : स्वयंसेवकांना काम करण्याची संधी : आदिवासी विकास विभागाचा उपक्रम
मुंबई - कोरोना लॉकडाऊनच्या काळात राज्यातील शहरी, ग्रामीण आणि आदिवासी नागरिकांना जाणवणारा मानसिक तणाव दूर करता यावा, सध्याच्या कठीण परिस्थितीत त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवता यावे यासाठी १८०० १०२ ४०४० हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या पुढाकाराने ’प्रोजेक्ट मुंबई’ व ’प्रफुल्लता’ या मानसिक स्वास्थ्यासाठी काम करणार्या या संस्थांच्या सहकार्याने ’संवाद’ हा अभिनव उपक्रम १९ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. ’संवाद’ उपक्रमाच्या अंतर्गत हेल्पलाइन क्रमांकाच्या सहाय्याने नागरिकांना समुपदेशकांशी मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेत संवाद साधता येणार आहे.
महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातील ३० समुपदेशक मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत या नागरिकांशी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत संवाद साधणार आहेत. ग्रामीण भागात समुपदेशनाची सेवा देऊ इच्छिणार्या समुपदेशक स्वयंसेवकांनी volunteer@projectmumbai.org या मेलआयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकाला ’संवाद’ च्या १८०० १०२ ४०४० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून त्यांना भेडसावणार्या समस्या, चिंता यांचे निरसन मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांमधून करून घेता येणार आहे. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील ३० मानसोपचार तज्ञ समुपदेशक विना मोबदला या सेवेद्वारे सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत मानसिक समस्यांवर मार्गदर्शन करणार आहेत. हे मानसोपचार तज्ञ समुपदेशक स्थानिक जिल्ह्यातील असून नागरिकांची स्थानिक बोली जाणणारे आहेत.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ