Ticker

6/recent/ticker-posts

मनसेच्या वतीने पत्रकार बांधवांना होमिओपॅथीक औषधीचे वितरण : इम्युनिटी वाढविण्यासाठी मदत होणार


मनसेच्या वतीने पत्रकार बांधवांना होमिओपॅथीक औषधीचे वितर
आयुष मंत्रालयाची शिफारस : इम्युनिटी वाढविण्यासाठी मदत होणार
वाशीम - कोरोना विषाणूपासून होणार्‍या नोवेल कोविड-19 या आजारावर मात करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारातुन व डॉ. गणेश मते यांच्या मार्गदर्शनात केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या व शरीरातील रोगप्रतिकार शक्ती (इम्युनिटी) वाढविण्यासाठी प्रभावी ठरणार्‍या होमिओपॅथीक औषधीचे वितरण प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडीयात कार्यरत सर्व पत्रकार बांधवांसह यात संलग्नीत विविध घटकांना करण्यात आले. हा आरोग्यदायी उपक्रम शनिवार, 19 एप्रिल रोजी लॉकडाऊनच्या नियमाचे पुरेपुर पालन करुन व सामाजीक अंतर राखून पार पाडण्यात आला.
 कोरोना विषाणूच्या महामारीचा संसर्ग वाढू नये व या विषाणूची साखळी नष्ट व्हावी यासाठी देशभरात येत्या 3 मे पर्यत अत्यावश्यक सेवा वगळता संपुर्ण लॉकडाऊन घोषीत करण्यात आले असून पोलीस प्रशासन या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी झटत आहेत. तर आरोग्य विभाग कोविड-19 आजाराची लक्षणे असलेल्या संशयास्पद व्यक्तींचा उपचार करत आहेत. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवेत मोडत असलेल्या प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकार, प्रतिनिधी, संगणक चालक, मुद्रणचालक असे विविध घटक शासनाच्या विविध घडामोडी व सुचना जनतेपर्यत पोहचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. लॉकडाऊनमध्ये प्रसारमाध्यमातील या घटकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या आर्सेनिकम व अल्बम 3 या होमिओपॅथीक औषधीचे वितरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील विविध वृत्तपत्रे व वाहीन्यांच्या कार्यालयात जावून पत्रकार बांधवांना सामाजीक अंतराचे भान ठेवून करण्यात आले. या होमिओपॅथीक औषधांच्या मोठ्या व्यक्तींसाठी रोज सकाळी उपाशीपोटी 4 गोळ्या व 3 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी रोज सकाळी उपाशीपोटी 2 गोळ्या घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. या उपक्रमासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मनिष डांगे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, गजानन वैरागडे, पत्रकार गजानन देशमुख, पंकज गाडेकर आदींंनी परिश्रम घेतले.