Ticker

6/recent/ticker-posts

निराधार, जेष्ठ नागरीक व दिव्यांगांच्या मदतीसाठी जिल्हा पोलीस दलाच्या विशेष पथकाचे गठन : जिपोअ श्री परदेशी यांची संकल्पना : मदतीसाठी पथकातील सदस्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन


निराधार, जेष्ठ नागरीक व दिव्यांगांच्या मदतीसाठी जिल्हा पोलीस दलाच्या विशेष पथकाचे गठन
जिपोअ श्री परदेशी यांची संकल्पना
मदतीसाठी पथकातील सदस्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन
वाशीम - सद्यास्थितीत देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिसत असुन २४  मार्च पासुन देशभरात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने वाशिम जिल्हयात संचारबंदीचे आदेश लागु करण्यात आले आहे. निराधार, जेष्ठ नागरीक व दिव्यांग (अपंग) व्यक्ती स्वत: घराबाहेर पडुन अत्यावश्यक वस्तु खरेदी करुन आणू शकत नाहीत. वेळप्रसंगी अशा व्यक्ती वैद्यकीय मदतीपासून वंचीत राहण्याची शक्यता आहे. निराधार, जेष्ठ नागरीक व दिव्यांग व्यक्तीना अशी अडचण निर्माण होवू नये याकरीता जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांचे कल्पनेतून अशा असहाय व्यक्तींच्या मदतीकरीता पोलीस अधिक्षक कार्यालयात विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. पथक प्रमुख म्हणुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक शिवाजी ठाकरे मोबाईल क्रमांक ८३८०९६४९९९, सहाय्यक पथक प्रमुख सहा . पो. निरिक्षक अतुल मोहनकर ८३७८९७११०९, सदस्य सहा. पो. उप. निरीक्षक भगवान गावंडे ९८५००४९८९१, पो. ना. किशोर चिंचोळकर ९०११४४०९९९, राम नागुलकर ९८५०३९६१०० यांची नेमणुक करण्यात आली आहे. जिल्हयातील निराधार जेष्ठ नागरीक व दिव्यांग (अपंग) व्यक्तींना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास वरील पथकातील अधिकारी / कर्मचारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. संबंधित पोलीस स्टेशनमधील बिट मार्शल, पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावरील पोलीस कर्मचारी, ग्रामीण भागातील बिट पेट्रोलिंगवर असलेले बिट कर्मचारी, निर्भया पथकात नेमणुकीस असलेल्या महिला कर्मचारी यांना निराधार, जेष्ठ नागरीक व दिव्यांग (अपंग) व्यक्तींचे मदतीसाठी, सर्वतोपरी मदत पोहचविणेबाबत जिल्हयातील सर्व ठाणेदार यांना पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांनी स्वत: सूचना निर्गमीत केल्या आहेत.