शालेय विद्यार्थ्यांसाठी लर्न फ्रॉम होम’ च्या पर्यायाची पडताळणी
शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतली राज्यातील सर्व अधिकार्यांची ऑनलाईन बैठक
मुंबई, दि. ७ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी देशात लॉकडाऊन झालेले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागातील राज्यातील सर्व अधिकार्यांची ऑनलाईन बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी लर्न फ्रॉम होम’ म्हणजेच घरी असतांनाही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल, यासंदर्भातील पर्यायांची पडताळणी करण्यास प्रा. गायकवाड यांनी यावेळी सांगितले. या ऑनलाईन बैठकीस अपर मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी, शिक्षण संचालक दिनकर पाटील तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थिती होते.
यावेळी श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना घरी बसूनही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल, यासाठी टी.व्ही., रेडिओच्या माध्यमातून अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी नियोजन करावे. त्यासाठी दैनंदिन शिक्षण आराखडा तयार करावा. शैक्षणिक कामासाठी तयार करण्यात आलेले ई मटेरियल बालभारती व एससीईआरटी यांनी एकत्रितपणे द्यावे. सर्व अधिकारी यांनी लक्ष निर्धारित काम करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
श्रीमती वंदना कृष्णा यांनी लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना कशा प्रकारे ऑनलाईन शिक्षण देता येईल, याबाबत अधिकार्यांकडून माहिती घेतली. दीक्षा प, स्मार्ट फोनद्वारे पालक, अधिकारी यांच्यामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात यश आल्याचे अधिकार्यांनी सांगितले. विद्यार्थी व शिक्षकांसाठी आराखडा दिल्याचे, त्याचप्रमाणे इयत्ता निहाय पालक,शिक्षकांचे व्हॉटसप ग्रुप तयार करण्यात आल्याचे अधिकार्यांनी नमूद केले.
विनाअनुदानित शाळांना टप्याटप्याने देण्यात येणार्या अनुदानबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य ती कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या. यावेळी नव्याने सुरू करण्यात येणार्या ’ऑनलाईन अधिकारी व्यावसायिक विकास मंचचे’ उद्घाटन प्रा. गायकवाड यांनी केले. अधिकार्यांनी त्याचा योग्य उपयोग करून स्वतःचा व्यावसायिक विकास साधावा असे त्यांनी आवर्जून सांगितले.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
