वाशिम कोरोना अलर्ट : ते ‘सोळा’ नमुने ‘निगेटीव्ह’
वाशीम - वाशीम जिल्हा कोरोना महामारीपासून अलिप्त असल्याच्या आनंदात जिल्हावासी असतांना अचानक तबलीघी जमात प्रकरणाशी संबंधीत जिल्हयातील एक व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह निघाल्यामुळे जिल्हावासीयांमध्ये धास्ती पसरली आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनासह आरेाग्य विभागही हायअर्लट मोडवर आला आहे. आज दि. ७ एप्रिलपर्यतच्या कोरोना अलर्ट स्थितीमध्ये आधी तपासणीसाठी पाठविलेल्या १७ नमुन्यांपैकी १ कोरोना पॉझीटीव्ह तर त्यानंतर आलेल्या १४ चाचण्यांच्या निगेटीव्ह अहवालासह आज आलेल्या उर्वरीत २ चाचण्यांचे अहवालही निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हयात तुर्तास केवळ १ व्यक्ती कोरोनाबाधीत असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. याशिवाय आजपर्यत जिल्हयातील अप्राप्त नमुने हे शुन्य आहेत. यासोबतच १८ व्यक्ती गृह अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहेत. व १ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणाामध्ये ठेवण्यात आला असल्याची माहिती आजच्या कोरोना अलर्ट मध्ये जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान तबलीघी जमात सारख्या प्रकरणात सहभागी जिल्हयातील व्यक्तींनी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्य सुरक्षेसाठी स्वत:हुन जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यासाठी पुढे यावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून त्यांच्या मदतीसाठी काही हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.
देशात विविध ठिकाणी झालेल्या जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे (भ्रमणध्वनी क्र. ९८५०५२५३५३) यांच्याशी संपर्क साधून आपली माहिती द्यावी अथवा ८३७९९२९४१५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून अथवा व्हॉटसअप संदेशाद्वारे किंवा ०७२५२-२३४२३८ या क्रमांकावर आपले नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक आदी माहिती सादर करावी. तसेच इतर नागरिकांनाही याबाबत काही माहिती असल्यास या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देता येईल. दरम्यान वाशीम जिल्हावासीयांना कोरोना या महामारीपासून दुर ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी श्री ऋषीकेश मोडक, जिल्हा पोलीस अधिक्षक श्री वसंत परदेशी या जिल्हयाच्या दोन खंबीर कर्णधारांसह जिल्हयातील संपूणर्र् आरोग्यसेवेची टिम, डॉक्टर्स, नसर्र्र्ेस, अंगणवाडी सेविका, आशासेविका, पोलीस बांधव, भगिनी हे कठोर परिश्रम घेत असल्यामुळे लवकरच वाशीम जिल्हा या महामारीपासून मुक्त होईल अशी आशा जिल्हावासीयांमध्ये निर्माण झाली आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
