Ticker

6/recent/ticker-posts

वाशीम जिल्हयातील कोरोना निदान व तपासणीसाठी नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची प्रयोगशाळा जाहीर


वाशीम जिल्हयातील कोरोना निदान व तपासणीसाठी नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची प्रयोगशाळा जाहीर
वाशीम - राज्यात दिवसंेंदिवस कोरोना (कोव्हिड-19) च्या आजाराचे रुग्ण वाढत असून या आजाराचे लवकरात लवकर निदान व्हावे या दृष्टीने राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हानिहाय व संस्थानिहाय तपासणी प्रयोगशाळा जाहीर केल्या. त्यानुसार वाशीम जिल्हयासह अकोला, अमरावती, बुलढाणा व यवतमाळ या पाच जिल्हयातील कोरोना आजाराच्या रुग्ण निदान व तपासणीसाठी नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची प्रयोगशाळा जाहीर केली आहे. याशिवाय इतर जिल्हा व संस्थानिहाय प्रयोगशाळाही जाहीर करण्यात आल्या असून त्या पुढीलप्रमाणे आहेत. 1. मुंबई महानगर महापालिकेकरिता - प्रयोगशाळा-  कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई. 2. ठाणे जिल्ह्याकरिता - रायगड, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोबिंवली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका, प्रयोगशाळा - ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालय, भायखळा, मुंबई 3. पालघर जिल्ह्याकरिता -  उल्हासनगर महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी- महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका बदलापूर नगरपालिका. प्रयोगशाळा-  हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परळ, मुंबई 4.  सातारा जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा- बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे 5. पुणे जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे 6. अहमदनगर जिल्ह्याकरिता व  नाशिक (मालेगाव, सटाणा तालुका वगळून) - प्रयोगशाळा- आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे 7. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, जि.सांगली 8. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद -  या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा - डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर 9. धुळे, जळगाव, नंदुरबार,  नाशिक (मालेगाव व सटाणा तालुका) या जिल्ह्याकरिता प्रयोगशाळा  श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे 10. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड,  बीड  - या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद 11. नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा - या जिल्ह्याकरिता -  प्रयोगशाळा - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.