Ticker

6/recent/ticker-posts

कोरोना जागतीक संकट; सामना करण्यासाठी घरी थांबा - तेजराव वानखडे


कोरोना जागतीक संकट; सामना करण्यासाठी घरी थांबा - तेजराव वानखडे
वाशीम - आतापर्यत शासन, प्रशासन, पोलीस यंत्रण आणि जनतेच्या सहकार्याने भारतात नियंत्रणात असलेला कोरोना व्हायरस सामाजीक संसर्गातून मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका निर्माण होत आहे. आणि ही साखळी तोडता आली नाही तर कोरोनाचे भिषण संकट देशावर निर्माण होवू शकते. त्यामुळे कोरोनाला हरविण्यासाठी त्याला तोंड देण्याची तयारी आपण आपल्यापासून करायला हवी. त्यासाठी आपणास काही सवयी बदलाव्या लागतील. व्यक्तीगत जीवनात काटकसर करण्याची सवय करुन घ्यावी लागेल. त्यामुळे ‘मीच माझा रक्षक, मी घरी थांबणार, मी कोरोनाला हरविणार’ असे भावनिक आवाहन रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांनी जिल्हयातील जनतेला केले आहे.
    एकवीस दिवसाचे लॉकडाऊन आहे. आपण घरीच थांबा, शासनाला व प्रशासनाला मदत करा. आपण बघतो, इतर देशाच्या तुलनेत भारतातील कोरोनाबाधीतांची संख्या बरीच कमी आहे. तरी भारताची व्याप्ती आणि प्रचंड लोकसंख्या पाहता अजुन खुप काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोना हे जागतीक युध्दापेक्षा मोठे संकट समजून आपण शासन व प्रशासनाने तसेच डॉक्टरांनी दिलेल्या नियमाचे पालन करा व कोरोनाला हरवा. त्याचप्रमाणे आपल्या जीवाची जोखीम पत्करुन कोरोनाविरुध्द लढणार्‍या डॉक्टर, नर्स, पॅरामेडीकल स्टॉफ, पोलीस प्रशासनाचा सन्मान करा असे भावनिक आवाहन तेजराव वानखडे यांनी केले.