युवक काँग्रेस रक्तदानातून पुरवणार दहा हजार रक्ताच्या पिशव्या
मुंबई: दि. २७ मार्च - कोरोनाच्या भितीमुळे नागरिकांनी रक्तदान शिबिरांकडे पाठ फिरवल्यामूळे राज्याच्या रक्तपेढ्यामध्ये रक्ताचा तुडवडा झाला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची मोठी गरज रुग्णांना आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील नागरिकांना आवाहन केले होते. या आवाहनास तात्काळ प्रतिसाद देत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना फेसबुक आणि ट्विटरवर रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले होते. सोबतच गर्दी टाळण्यासाठी सरकार आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करत टोकन पध्दतीने प्रत्येक नागरिकास वेगळी वेळ देण्याची सूचना देखील केली होती. या आवाहनास तात्काळ प्रतिसाद देत युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी टोकन पद्धतीने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले असून राज्यात चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांनी कोरोनाच्या काळात जनतेला रक्तदानासाठी जनतेला प्रवृत्त करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांसोबत युवक काँग्रेसने धुळ्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान केले आहे.
युवक कॉंग्रेस तर्फे हेल्पलाईन नंबर आणि कंट्रोल रूम...
युवक कॉंग्रेसतर्फे प्रत्येक जिल्ह्यात कंट्रोल रुम उभारण्यात येणार असून एक हेल्पलाईन नंबर देखील देण्यात येणार आहे. आपल्या घरापासून कामानिमित्त दूर आलेले लोक २१ दिवसीय लॉकडाऊन मूळे इतर राज्यात अडकलेले लोक मदतीसाठी आणि अन्न, वस्त्र निवारा तसेच वैद्यकीय आणि इतर गरजांसाठी युवक काँग्रेसशी संपर्क करू शकतील. सोबतच स्थानिक नागरिकांना रक्तदान करावयाचे असल्यास किंवा औषधाची गरज असल्यास ह्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करू शकतात. तसेच, गर्भवती महिला, नवजात अर्भके,बालके, किमोथेरपी, डायलिलीसचे पेशंट. ज्येष्ठ नागरिक यांच्या मदतीसाठी कुणीही हेल्पलाईन वर संपर्क करू शकतील, अशी माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसतर्फे राज्याच्या विविध भागात विद्यार्थ्यांना मोफत पार्सल जेवणाची व्यवस्था आणि पोलिसांना सर्जिकल मास्कचे वाटप देखील चालू आहे. कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस ही वचनबद्ध असून सर्वच पातळीवर युवक कॉंग्रेस लढण्यासाठी सज्ज असून संपूर्ण राज्यास युवक काँग्रेस दहा हजार रक्ताच्या बाटल्यांचा पुरवठा करेल, असे तांबे यांनी सांगितले.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ