नालंदानगर येथील संयुक्त उत्सव जयंती कार्यक्रम स्थगित
उत्सव समिती अध्यक्ष ताजणे व सचिव चंद्रशेखर यांची माहिती
वाशीम - जिल्हयात येत्या 14 एप्रिलपर्यत संचारबंदीच्या पार्श्वभूमिवर शहरातील नालंदानगर येथील क्रांतीज्योती महात्मा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव स्थगीत करण्यात आल्याची माहिती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल ताजणे व सचिव डॉ. सहदेव चंद्रशेखर यांनी दिली.
नालंदानगर येथे दरवर्षी या महापुरुषांची जयंती समाजबांधवांच्या सहभागातून 11 ते 14 एप्रिल असे चार दिवस मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शेवटच्या दिवशी समाजबांधवांच्या सहभागातून भव्य रॅली काढण्यात येते. यावर्षीही जयंतीच्या अनुषंगाने समिती गठीत करण्यात येवून सामाजीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरोना व्हायरस या रोगाची जागतिक महामारी लक्षात घेवून या रोगाचा संपुर्ण नायनाट करण्यासाठी देशात 14 एप्रिलपर्यत संचारबंदी लागु करण्यात आली आहे. त्यामुळे नालंदानगर येथील दरवर्षी चालत आलेला क्रांतीज्योती महात्मा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याचे समितीच्या वतीने अध्यक्ष अनिल ताजणे व सचिव डॉ. सहदेव चंद्रशेखर यांनी कळविले आहे.