जंतुनाशक धुर फवारणीत वाशीम न.प. च्या आरोग्य विभागाचा पक्षपात
वाहन जात नसल्याचे कारण सांगुन गल्लीबोळ्या सोडल्या
वाशीम - चिनच्या वुहान शहरापासून उमग पावलेल्या करोना या महाभयंकर विषाणूने जागतीक महामारीचे रुप धारण केले असून या महामारीपासून देशाला मुक्त करण्यासाठी शासन, प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. यासोबतच प्रत्येक जिल्हयातील महापालीका, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत स्तरावर जंतुनाशक धुर फवारणीचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली असतांना वाशीम नगर परिषद अद्यापही या बाबतीत उदासिन दिसत आहे. नगर परिषदेच्या वतीने उशिरा शहरात ट्रॅक्टरव्दारे धुर फवारणी सुरु करण्यात आली. या धुर फवारणीमध्येही संबंधीत कर्मचार्यांकडून अनेक प्रभागात पक्षपातीपणाचे धोरण अवलंबिण्यात आले. शहरात अनेक गल्लीबोळ्या आहेत. या गल्ल्यांमध्ये अनेक नाल्या आहेत. या नाल्या कित्येक दिवस साफ केल्या जात नाहीत. नगर परिषदेचे सफाई कर्मचारी या ठिकाणी फिरकतच नाहीत अशी नागरीकांची ओरड आहे. शहरातील अनेक प्रभागातील अशा गल्लीबोळांमध्ये ट्रॅक्टर जात नसल्याचे कारण देवून धुर फवारणी करण्यात आली नाही. शहरातील मुख्य रस्त्यांवरील नाल्यांपेक्षा जास्त गरज अशा गल्लीबोळातील नाल्यांमध्येच धुर फवारणी करण्याची गरज असतांना नगर परिषदेकडून नियुक्त कर्मचार्यांकडून मनमानी धोरणाने शहरातील अनेक प्रभागातील गल्लीबोळ्या सोडण्यात आल्याच्या तक्रारी नागरीकांनी केल्या आहेत.
नगर परिषदेवर मागील भाजपा सत्ताकाळात आमदार राजेंद्र पाटणी यांनी शहरातील अंडरग्राऊंड पाईपलाईन व अंडरग्राऊंड नाल्यांच्या प्रश्नाला हात घातला होता. यासाठी शासनाचे व जनतेचे कोट्यावधी रुपये ओतण्यात आले. एवढा निधी खर्चुनही अंडरग्राऊंड नाल्यांचे काम अद्याप पुर्ण झाले नाही. हे वास्तव मुख्य शहरात पाहणी केल्यास लक्षात येते. मुख्य शहरातील राजनी चौक, मन्नासिंह चौकासह अनेक ठिकाणच्या नाल्या व नाले धोकादायक स्थितीमध्ये उघडे पडल्याने नागरीकांच्या जिवित्वाला कायम धोका निर्माण झाला आहे. तसेच अनेक नागरीक अनावधानाने या नाल्यांमध्ये पडून जखमी झाले आहेत. अंडरग्राऊंड नाल्यांचे काम अजूनही पुर्ण न झाल्याने नगर परिषद यंत्रणा व संबंधीत ठेकेदारांच्या साक्षीने या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे वादंग मध्यंतरीच्या काळात वर्तमानपत्रात मोठ्या मथळ्यांच्या रुपाने गाजले होते. मात्र तेरी भी चुप मेरी भी चुप या म्हणीप्रमाणे पेल्यातील हे वादळ पेल्यातच शमले आहे. यावर आता कोणीच पोटतिडकीने बोलत नाही ही चिंतेची बाब आहे.
आता करोना या आजाराने भारतभरात भयानक स्वरुप धारण केल्याने या जागतीक महामारीला भारतातून पिटाळून लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोडणार्या वाशीम नगर परिषदेची आरोग्य यंत्रणा पुरेशी सक्षम असणे गरजेचे आहे. मात्र शहराचा अवाढव्य विस्तार होवूनही नगर परिषदेची आरोग्य यंत्रणा किती सक्षम आहे याची जाणीव शहरातील नाल्यांची स्वच्छता पाहिल्यास लक्षात येते. या महामारीच्या पार्श्वभूमिवर न.प. च्या आरोग्य विभागासह संपुर्ण यंत्रणा गाफील राहील्यास विविध रोगराईच्या महामारीचे संकट केव्हाही शहराची मुख्य वेश ओलांडू शकते हे निश्चित आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ